लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. अर्थात इंग्लंडने नाणेफेक जिंकली पण संपूर्ण दिवस भारतीय संघाच्या नावावर राहिला. दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताने तीन गडी गमावून 276 धावा केल्या होत्या.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाची स्थिती आणखी मजबूत होऊ शकली असती, पण अखेरच्या क्षणांमध्ये विराट कोहलीच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. विराटला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने आपला बळी ठरवले आणि पहिला दिवस संपता-संपता भारतीय संघाला मोठा दणका दिला.
विराट जबरदस्त लयीत दिसत होता. असे वाटत होते की, आज तो मोठी खेळी करेल, परंतु त्याला आपला डाव 42 धावांच्या पुढे नेता आला नाही. रॉबिन्सनने त्याला कर्णधार जो रुट करवी झेलबाद केले. आणि पुन्हा एकदा लाखो चाहत्यांचे त्याचे 71 वे शतक पाहण्याचे स्वप्न भंगले. विराटने 103 चेंडूत 3 चौकारांसह 42 धावांची खेळी केली. तसेच ही खेळी करताना त्याने केएल राहुलसह तिसऱ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली.
HUUUUUGE WICKET!! 🙌
Scorecard/Clips: https://t.co/GW3VJ3wfDv
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/bTIsg7pukq
— England Cricket (@englandcricket) August 12, 2021
बरोबर दोन वर्षांपूर्वी 14 ऑगस्ट 2019 विराटने वेस्टइंडिज विरुद्ध 70वे आंतरराष्ट्रीय शतक लगावले होते. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही त्याने त्याचे प्रथम स्थान गमावले आहे. इंग्लंड संघाचा कॅप्टन जो रूट आता प्रथम स्थानावर विराजमान झाला आहे.
मात्र, टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलने शतक झळकावले आणि रोहित शर्माने त्याला सुरेख साथ देत, भारताला मजबूत स्थितीत आणले. रोहित 83 धावांवर आणि केएल राहुल 129 धावांवर बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकींग! विश्वविजेत्या भारतीय कर्णधार उन्मुक्त चंदने केली निवृत्तीची घोषणा
अरेरे! रहाणेचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच चेंडूवर धरली तंबूची वाट, पाहा व्हिडिओ