सात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडरर आज आपल्या विम्बल्डन अभियानाची सुरुवात करणार आहे. ३५ वर्षीय फेडररला विम्बल्डन स्पर्धेसाठी तृतीय मानांकन मिळालं आहे.
पहिल्या फेरीत फेडररचा सामना युक्रेनच्या अलेक्सान्डर डॉगोपोलॉवशी सेन्टर कोर्टवर होणार आहे. अलेक्सान्डर डॉगोपोलॉव सध्या जागतिक क्रमवारीत ८४व्या स्थानावर आहे.
जानेवारी महिन्यात विक्रमी १८व ग्रँडस्लम जिंकणारा फेडरर आपल्या आवडत्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यासाठी नक्कीच उत्सुक असणार आहे. २०१७ च्या मोसमात फेडररने जे दोन पराभव पहिले आहे त्यात त्याला जागतिक क्रमवारीत १०० च्या आत नसणाऱ्या खेळाडूंनी हरवलं आहे. त्यामुळे फेडरर यावेळी पूर्ण क्षमतेने अशा खेळाडूंविरुद्ध कोर्टवर उतरणार यात शंका नाही.
हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरु होईल.
A refreshed Roger Federer sets his sights on an 8th #Wimbledon title.
Day 2 Preview: https://t.co/9m1QuvEtTr pic.twitter.com/sF0yayRpzc
— Wimbledon (@Wimbledon) July 4, 2017