रॉजर फेडरर आणि विश्वविक्रम ही आता नवी गोष्ट राहिली नाही. काल विम्बल्डन २०१७च्या पहिल्याच सामन्यात अलेक्साण्डर डॉगोपोलॉवने दुखापतीमुळे फेडरर विरुद्ध दुसऱ्या सेटनंतर माघार घेतली आणि आणि रॉजर फेडररच्या नावावर एक नवा विश्वविक्रम जमा झाला.
विम्बल्डनमध्ये सार्वधिक एकेरी सामने जिकंण्याचा विश्वविक्रम आता रॉजर फेडररच्या नावावर झाला आहे. फेडररने आजपर्यंत विम्बल्डनमध्ये ८५ विजय मिळवले आहेत. यापूर्वी हा विक्रम महान टेनिसपटू जिमी कॉनर्स यांच्या नावावर होता. त्यांनी विम्बल्डनमध्ये एकेरीत ८४ विजय मिळवले आहेत.
सध्या खेळत असलेल्या जोकोविचच्या नावावर ५५ तर अँडी मरेच्या नावावर ५४ विजय असून ते अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.
विम्बल्डनमध्ये एकेरीत सर्वाधिक विजय मिळवणारे खेळाडू
८५ रॉजर फेडरर
८४ जिमी कॉनर्स
७१ बोरिस बेकर
६३ पिट सम्प्रास
५९ जॉन मकेन्रो
५५ नोवाक जोकोविच
५४ अँडी मरे