अनेक वर्ष मैदानावर प्रतिस्पर्ध्यांला खेळामध्ये धडक देणारा रॉजर फेडरर आता नवीन रुपात दिसून येणार आहे. 20 वेळा प्रमुख विजेता असलेला फेडरर आता ड्रायव्हिंग अॅप Waze चा नवीन आवाज म्हणून प्रवाशांना खुल्या रस्त्यावर नेव्हिगेट करण्यास मदत करेल. निवृत्त झालेला पॉलीग्लॉटिक टेनिस स्टार आता इंग्रजी, फ्रेंच किंवा जर्मनमध्ये दिशानिर्देश देऊ शकणार आहे. तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुकूल नेव्हिगेशन रेकॉर्ड करणारा तो पहिला व्यक्ती असेल. याबाबतची संपुर्ण माहिती नेव्हिगेशन अॅपने बुधवारी (31 मे) सांगितले.
41 वर्षीय स्विसने फेडररला प्रत्येक वाहन चालकाला मूलभूत दिशानिर्देशांव्यतिरिक्त (navigate) विविध प्रकारचे प्रेरणादायी संदेश देखील देण्यास सांगतले आहे. Google च्या मालकीच्या कंपनीने घोषणा केली की ड्रायव्हिंग करताना फेडररचा आवाज अॅपच्या व्हॉईस नेव्हिगेशन वैशिष्ट्यास सक्षम करण्यासाठी वापरला जाईल.
नवीन आवज देखील अॅपमध्ये झाले सामील
फेडररच्या (Roger Federer) आवाजाव्यतिरिक्त, वेझ अॅपने अनुभव प्रवाशांचा अनूभव वाढवण्यासाठी व्हिक्टोरियस नावाचा नवीन मूड देखील जोडला आहे. तसेच अॅपप सेटिंग्जमध्ये निवडण्यासाठी तुम्हाला रॉजरची G-क्लास SUV आणि Maybach S-Class Cabriolet कार आयकॉन सुद्धा मिळतील. या महिन्याच्या सुरुवातीला लोकप्रिय स्टँड-अप कॉमिक हसन मिन्हाज आणि पॉप रॉक बँड जोनास ब्रदर्स यांसारखे इतर सेलिब्रिटींनी आपला आवाज सादर केल्यानंतर हे अॅपप अपडेट करण्यात आले आहे. शिवाय, नेव्हिगेशन अॅपला आवाज देण्यासाठी Waze ने यापूर्वी अमेरिकन गायिका आणि गीतकार क्रिस्टीना अगुइलेरा यांच्याशी देखील भागीदारी केली होती. (Waze voice)
वेझचा नवीन आवाज ‘फेडरर’
फेडररने 2022 मध्ये निवृत्ती घेतली. तसेच त्याच्या नावावर 20 प्रमुख एकेरी किताब देखील आहेत. Waze अॅपमध्ये माजी विश्वविजेत्याचा आवाज ऐकण्यासाठी, अॅपपच्या वरच्या-डाव्या कोपर्यात हॅम्बर्गर मेनू बटणावर टॅप करा. नंतर सेटिंग्ज > आवाज > Waze voice वर जा. पुढे, यादीमध्ये फेडररचा आवाज शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा. तुमच्या Android किंवा iPhone वरील Waze अॅपप नवीनतम आवृत्तीवर अपडेट केल्याची खात्री नक्की करा. या वर्षाच्या सुरुवातीला, Waze ने वाहन चालवताना EV चार्जिंग स्टेशन शोधण्याची क्षमता देखील जोडली आहे. हे आता वापरकर्त्यांना त्यांचे इलेक्ट्रिक कार मॉडेल आणि प्लग प्रकार देखील अॅपमध्ये जतन करण्यास अनुमती देते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
WTC फायनलवर पावसाचे सावट! खेळ न झाल्यास असा ठरवला जाणार विजेता
ओमानमध्ये काट्याची टक्कर! फायनलमध्ये भारत अन् पाकिस्तान आमने-सामने, कोण रचणार इतिहास?