राॅजर फेडररने रविवारी संध्याकाळी मर्सडिज कपच्या अंतिम फेरीत मिलोस राॅवनिकचा ६-४, ७-६ (७-३) असा पराभव केला. याबरोबर त्याने कारकिर्दीतील ९८व्या विजेतेपदाला गवसणी घातली.
टेनिसमध्ये सर्वाधिक विजेतेपदं जिंकण्याचा पराक्रम जिमी काॅनोर्स यांनी केला आहे. त्यांनी तब्बल १०९ विजेतेपदांवर नाव कोरले आहे तर या यादीत आता फेडरर दुसऱ्या स्थानी आला आहे.
फेडरर या स्पर्धेत विंबल्डनची तयारीच्याच दृष्टीनेच उतरला होता. ही स्पर्धा ग्रास कोर्टवर होत असल्यामुळे आणि त्यात विंबल्डन आधी होत असल्याने फेडरर या स्पर्धेत खेळायला प्राधान्य देतो.
क्ले कोर्टचा संपुर्ण हंगाम न खेळलेल्या फेडररला टीकाकारांना चोख प्रतित्तोर देण्यासाठी ह्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणे महत्त्वाचे होते. तब्बल ११ आठवडे हा दिग्गज खेळाडू स्पर्धोत्मक टेनिसपासून दुर होता.
या स्पर्धेत त्याने ५ सामन्यात केवळ २ सेट गमावत विजेतेपदावर नाव कोरले. यात त्याने उपांत्यफेरीत चौथ्या मानांकित निक किग्रिओसला तसेच अंतिम सामन्यात मिलोस राॅवनिकला पराभूत केले.
अंतिम सामन्यात त्याने मिलोस राॅवनिकला कोणतीही संधी दिली नाही. पहिला सेट ६-४ असा जिंकल्यावर दुसऱ्या सेटमध्ये टायब्रेकरमध्ये ७-३ असा विजय मिळवला.
याबरोबर सोमवारी घोषीत होणाऱ्या एटीपी क्रमवारीत त्याने आपले अव्वल स्थान कायम केले. फेडररचे हे ग्रास कोर्टवरील १८वे विजेतेपद आहे. यावर्षीचे त्याचे हे तिसरे विजेतेपद असुन त्यात त्याने आॅस्ट्रेलियन ओपन आणि रोटरडॅम ओपनचे विजेतेपद जिंकले आहे.
गेल्या १५ हंगामापैकी १३व्यांदा फेडररने ३ किंवा त्यापेक्षा अधिक विजेतेपदं जिंकली आहे. फेडररने २४ ग्रास कोर्ट फायनलमध्ये १८व्यांदा विजेतेपद जिंकले असुन केवळ ६ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हे ६ पराभव हे कारकिर्दीत एकदातरी एटीपी क्रमवारीत पहिल्या २मध्ये आलेल्या खेळाडूंकडून झाले आहेत.
सर्वाधिक एटीपी विजेतेपदं जिंकणारे खेळाडू
१०९- जिमी काॅनोर्स
९८- राॅजर फेडरऱ
८४- इवान लेंडल
७९- राफेल नदाल
७७- जाॅन मॅकेन्रो
६८- नोवाक जोकोविच
६४- बियाॅन बाॅर्ग
६४- पीट सॅंप्रास@Maha_Sports #म #मराठी @kridajagat @MarathiBrain @MarathiRT pic.twitter.com/WgQNIL3Ec1— Sharad Bodage (@SharadBodage) June 17, 2018
राॅजर फेडररने १४८ एटीपी फायनल्समध्ये ९८व्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली. तर सर्वाधिक वेळा विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम जिमी काॅनोर्स यांनी केला आहे. त्यांनी १६४ फायनल्समध्ये १०९ विजेतेपदं जिंकली आहेत. @Maha_Sports #म #मराठी @kridajagat @MarathiBrain @MarathiRT pic.twitter.com/oHJzQ095kp
— Sharad Bodage (@SharadBodage) June 17, 2018
सर्वाधिक वेळा एटीपी फायनल्स खेळणारे खेळाडू
१६४- जिमी काॅनोर्स
१४८- राॅजर फेडरर
१४६- इवान लेंडल
११५- राफेल नदाल
१०९- जाॅन मॅकेन्रो@Maha_Sports #म #मराठी @kridajagat @MarathiBrain @MarathiRT pic.twitter.com/4m1gYjt7zZ— Sharad Bodage (@SharadBodage) June 17, 2018
एटीपी क्रमवारीत सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहणारे खेळाडू (१८ जून २०१८ रोजी)
३१०- राॅजर फेडरर
२८६- पीट सॅंप्रास
२७०- इवान लेंडल
२६८- जिमी काॅनोर्स
२२३- नोवाक जोकोविच
१७७- राफेल नदाल
१७०- जाॅन मॅकेन्रो
१०९- बियाॅन बाॅर्ग
१०१- आंद्रे अगासी@Maha_Sports #म #मराठी @kridajagat pic.twitter.com/PuRmnLvfoy— Sharad Bodage (@SharadBodage) June 17, 2018