सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या उपस्थितीत पहिल्यांदाच होत असलेल्या खेळाडूंच्या कामगिरी मुल्यमापन बैठकीला भारतीय संघाचा उपकर्णधार रोहीत शर्माला आमंत्रित देण्यात आले आहे. ही बैठक आज (10 आॅक्टोबरला) हैदराबाद येथे होणार आहे.
रोहित बरोबर प्रशासकीय समितीचे सदस्य, कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवि शास्त्री, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, निवड समितीचे मुख्य सदस्य एमकेएस प्रसाद या बैठकीला हजेरी लावणार आहेत.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अाधिकाऱ्याने रोहित या बैठकीला हजेरी लावणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
या बैठकीत निवडीचे निकस तसेच खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानधनाबाबत चर्चा होणार आहे.
भारतीय संघात मागील काही दिवसांपासून सतत खेळाडू बदलले जातात. त्यावर प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व आहे.
”खेळाडूंना संघात जास्तीत जास्त संधी दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो.” असे रोहितची एशिया कप स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते.
करुण नायर आणि मुरली विजय यांना विंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेतून वगळल्यानंतर त्यांनी निवड समितीमध्ये संवादाचा अभाव असल्याची टीका केली होती.
त्या पार्श्वभुमीवर बोलताना प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितले. ”खेळाडू आणि संघ व्यवस्थापन यांच्यात चांगला संवाद होत असेल तर त्यात आपल्याला हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही.”
महत्वाच्या बातम्या-
- क्रिकेटप्रेमी मुंबईकरांना मोठा धक्का! वानखेडेवरील मॅच संदर्भात होऊ शकतो मोठा निर्णय
- ५ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी सचिनने केली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
- धोनीच्या या निर्णयाने खलील अहमद झाला निशब्द