रोहित शर्मा 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. हिटमॅनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आतापर्यंत रोहित शर्मा फलंदाजीसह चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात हिटमॅनने शानदार खेळी खेळली आणि 41 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 92 धावा केल्या. या खेळीमुळे रोहित शर्माने असा विक्रम केला जो एमएस धोनीसारखा महान कर्णधारही करु शकला नाही.
खरं तर, रोहित शर्मा टी-20 विश्वचषकाच्या एका आवृत्तीत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. याआधी 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला होता. रोहित शर्मा एकदिवसीय आणि टी20 विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. दोन्ही फॉरमॅटमध्ये विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला.
यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय कर्णधाराने 6 सामन्यात 38.20 च्या सरासरीने आणि 159.17 च्या स्ट्राईक रेटने 191 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत. हिटमॅनने आतापर्यंत 16 चौकार आणि 13 षटकार मारले आहेत.
याआधी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्माने कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा केल्या होत्या. रोहितने 11 सामन्यांच्या 11 डावात 54.27 च्या सरासरीने 597 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतके झळकावली.
आत्तापर्यंत रोहित शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 59 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 157 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हिटमॅनने कसोटीच्या 101 डावात 4137 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 12 शतके आणि 17 अर्धशतके झळकावली. याशिवाय रोहितने 254 एकदिवसीय सामन्यात 10709 धावा केल्या आहेत ज्यामध्ये रोहितने 31 शतके आणि 55 अर्धशतके केली आहेत. आणि आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांच्या 149 डावांमध्ये 4165 धावा केल्या आहेत यादरम्यान त्याने 5 शतके आणि 31 अर्धशतके केली आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
ठरलं तर! एक गोष्ट जुळून आली की टीम इंडिया थेट फायनलमध्ये
“क्रिकेट मैदानापासून बॉलीवूडपर्यंत…” युवराज सिंगची डेव्हिड वाॅर्नरसाठी खास पोस्ट
भारत की इंग्लंड..गयानामध्ये कोणाचं दबदबा, टीम इंडियासाठी 2 खुशखबर, फायनलचं तिकीट पक्कं?