हार्दिक पंड्या इंडियन प्रीमियर लीग 2024मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असणार आहे. रोहित शर्मा याच्याकडून आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्याआधी मुंबईचे कर्णधारपद काढून घेतले गेले. मुंबई फ्रँचायझीचा हा निर्णय रोहितच्या चाहत्यांना जराही पटला नाही, असे मागच्या काही दिवसांमध्ये सतत पाहायला मिळाले आहे. पण भारताचा माजी माजी वेगवान गोलंदाज प्रवीन कुमार याने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आणि रोहित शर्मा यांच्याबाबत खास प्रतिक्रिया दिली.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण करू शकला. त्याने सुरुवातीच्या आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी केली आणि भारतीय संघात स्थान पक्के केले. असे असले तरी आयपीएल 2022 आधी मुंबईने हार्दिक पंड्याला संघातून रिलीज केले आणि लिलावत देखील त्याला खरेदी करू शकले नाहीत. गुजरात टायटन्सने 15 कोटी रुपयांमध्ये हार्दिकला स्वतःसोबत जोडले आणि संघाचा कर्णधार बनवले.
कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात हार्दिकने गुजरातला आयपीएल चॅम्पियन बनवले. तर आयपीएल 2023 मध्ये त्याच्याच नेतृत्वात गुजरात संघ उपविजेता ठरला. भविष्याचा विचार करून आयपीएल 2024 साठी मुंबईने हार्दिकला पुन्हा संघात सामील केले. लीलावानंतर मुंबईने अष्टपैलूला गुजरातकडून स्वतःकडे ट्रेड केले आणि संघाचे कर्णधारपद देखील त्याच्याच हातात सोपवले आहे. दुसरीकडे संघाला पाच आयपीएल ट्रॉफी मिळवून देणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यावर अन्याय झाल्याच्या चर्चा मागच्या काही काळापासून सर्वत्र होत आहेत. असे असले तरी, माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार याच्या मते कर्णधारपद केल्याने रोहितला काहीच फरक पडणार नाही.
टाईम्स ऑफ इंडियाशी चर्चा करताना प्रवीण कुमार म्हणाला, “मला नाही वाटत की यामुळे रोहितला काही फरक पडेल. कारण त्याला स्वतःची भूमिका चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तो कर्णधार आहे की नाही, यामुळे रोहितला काहीच फरक पडणार नाही. मला विश्वास आहे की, मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने या निर्णयाबाबत रोहितशी चर्चा केली होती. रोहितशी चर्चा केल्याशिवाय मुंबई इंडियन्स एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही.”
दरम्यान, हार्दिक पंड्या ऑगस्ट 2023 नंतर एकही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सामना खेळला नाहीये. अशात आयपीएलमध्ये त्याचे पुनरागमन होईल, तेव्हा अष्टपैलूचा फॉर्म सर्वांना पाहायला आहे. तसेच कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्ससाठी हार्दिक काय कमला करतो, याकडेही सर्वांचे लक्ष असेल. (Rohit doesn’t care! The former fast bowler spoke about the captaincy of Mumbai Indians)
महत्वाच्या बातम्या –
कर्णधाराकडून कोचकडे दुर्लक्ष, वाचा रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात तामिळणाडूच्या पराभवाचे खरे कारण
एलिस पेरीचा काच फोट षटकार! टाटा कारचे नुकसान झाल्यानंतर ‘अशी’ होती प्रतिक्रिया