भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत स्टीव स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स या मालिकेत खेळत नसल्याने स्मिथच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उभय संघांतील दुसरा वनडे सामना रविवारी दुपारी विशाखापट्टणम याठिकाणी सुरू झाला. कर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या स्मिथने या सामन्यात एक जबरदस्त झेल घेतला, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय संघाने (Team India) विशाखापट्टणम वनडे सामन्यात नाणेफेक गमावल्यामुळे संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. पावरप्लेच्या षटकांमध्येच भारताने पहिल्या पाच विकेट्स गमावल्या आणि संघावरचा दबाब चांगलाच वाढला. भारतीय संघाची वाचवी विकेट घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ याची भूमिका महत्वाची होती. स्मिथ स्लीप्समध्ये श्रेत्ररक्षण करत होता. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या बॅटला चेडू लागून स्लीप्सच्या गेला, पण स्मिथ या चेंडूपासून काही अंतरावर होता. कोणत्याही खेळाडूसाठी हा झेल घेणे कठीण होते. पण स्मिथने अगदी रोजचे काम असल्यासारखाच हा झेल घेतला. स्मिथने मैदानातील चपळाई पाहून चाहते भारावून गेले. स्मिथचा हा झेल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
https://twitter.com/Swati_bomb/status/1637379342559858688?s=20
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतीय संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल स्वस्तात बाद झाल्याने संघाला सुरुवातीपासूनच गळती लागली. गिलने शुन्य, तर रोहितने 13 धावा करून विकेट गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादव 0, केएल राहुल 9, तर हार्दिक पंड्या 1 धाव करून बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला विराट मांत्र संयमी खेळ दाखवताना दिसला. भारताने पाचवी संघाची धावसंख्या 49 असताना गमावली. एकटा हार्दिक पंड्या वगळता इतर चारही विकेट वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने घेतल्या. हार्दिकची विकेट शॉन ऍबॉट (Sean Abbott) याने घेतली.
https://twitter.com/sexycricketshot/status/1637378051377098753?s=20
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शम.
ऑस्ट्रेलिया: ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन ऍबॉट, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, ऍडम झंपा.
(Rohit is also speechless after seeing Steve Smith’s incredible catch, watch the video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विशाखापट्टणममध्ये मोठी कामगिरी करणार स्टीव स्मिथ? भारताविरुद्ध मोडणार दिग्गजाचा विक्रम
WPL 2023 । एलिस पेरीकडून स्मृती मंधानाचे कौतुक, जाणून घ्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलूला काय भावले