प्रो कबड्डीच्या पुणे लेगच्या चौथ्या दिवशी रोहितने प्रो कबड्डीमधील सर्वात मोठा विक्रम आपल्या नवे केला. १२ ऑक्टोबर रोजी रिशांकने केलेला एका सामन्यात २८ गुण मिळवण्याचा विक्रम रोहितने मोडला. या सामन्यात रोहितने एकूण ३२ गुण मिळवले. त्यातील ३० गुण रेडींगमध्ये होते तर दोन गुण डिफेन्समध्ये मिळवले. त्याने २५ टच गुण मिळवले तर ५ बोनस गुण मिळवले.
प्रो कबड्डीमध्ये पुणे लीगच्या चौथ्या दिवशी रोहित कुमारने आपल्या जादुई खेळाचे प्रदर्शन करत रेडींगमध्ये २०० गुण मिळवण्याचा विक्रम केला. या सामन्यात त्याने एकूण २०० गुण मिळवण्याचा देखील पराक्रम केला होता.
या सामन्यापूर्वी रोहितने २० सामन्यात १९० गुण मिळाले होते. त्यातील १८० गुण रेडींगमध्ये होते तर १० गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले होते. या सामन्यात त्याने रेडींगमध्ये २० गुण मिळवत २०० रेडींग गुणांचा विक्रमी आकडा गाठला. केवळ रेडिंगमध्ये २०० गुण मिळवणारा रोहित कुमार तिसरा खेळाडू ठरला.
पूर्ण सामन्यात जबरदस्त खेळ करणाऱ्या रोहितने पंकजला बाद करत २०० गुण मिळवले. या सामन्यात युपी संघाने रिशांक देवाडिगा आणि नितीन तोमर यांना आराम दिला होता. या सामन्यात रोहितने तीन मोठे विक्रम आपल्या नावे केले.