प्रो कबड्डीमध्ये आज युपी योद्धा आणि बेंगलूरु बुल्स तिसऱ्यांदा आणि या मोसमात अंतिम वेळेस आमने सामने आले. या सामन्यात रोहित कुमारला एका मोसमात एकूण २०० गुण करण्यासाठी १० गुणांची आवश्यकता होती.
पहिल्या सत्रात युपीला दोन वेळा सर्वबाद केले आणि रोहितने रेडींगमध्ये जबरदस्त कामगिरी करत पहिल्याच सत्रात सुपर टेन केला. त्याचबरोबर प्रो कबड्डीमध्ये एका मोसमात २०० गुण मिळवणारा तो तिसरा खेळाडू ठरला.
सामन्यात सुरुवातीपासूनच बेंगलूरु बुल्सचा दबदबा राहिला. रोहित कुमारच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर बेंगलूरु बुल्स संघाने ८व्या मिनिटालाच युपीला सर्व बाद केले. त्यानंतर १३ व्या मिनिटाला युपी संघ दुसऱ्यांदा सर्व बाद झाला. रोहितने राजेश नरवाल याला बाद करत त्याने सुपर टेन केला आणि एका मोसमात २०० गुणांचा टप्पा पार केल.
या सामन्याअगोदर रोहितच्या नावावर २० सामन्यात १९० गुण होते. सामन्याचे पहिले सत्र संपले तेव्हा बेंगलूरु बुल्स २७-१० असे आघडीवर होते.
यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-
# रोहित कुमार प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमात स्पर्धेतील सवोत्कृष्ट खेळाडू होता. पटणा पायरेट्सला त्यांचे पहिले-वाहिले विजेतेपद मिळवून देण्यात रोहीत कुमारचा खूप मोठा वाटा राहिला होता.
# रोहितने युपी विरूद्धच्या आजच्या सामन्यात सुपर टेन करत आपला २०० गुणांचा टप्पा पार केला. त्याने सामन्यात सुपर टेन लगावत २०० गुण मिळवणारा तिसरा खेळाडू बनला.
प्रो कबड्डीच्या एका मोसमात २०० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे खेळाडू.
१ प्रदीप नरवाल- २१ सामने, एकूण गुण २६७, रेडींग गुण २६७, डिफेन्समधील गुण ०
२ अजय ठाकुर -२२ सामने,एकूण गुण २२२,रेडींगमधील गुण २१३, डिफेन्समधील गुण ०९