सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. उभय संघातील वनडे मालिका २७ जुलै रोजी समाप्त होईल. त्यानंतर दोन्ही संघ टी२० मालिकेत एकमेकांशी भिडणार आहेत. वनडे मालिकेसाठी संघातील काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा याचा देखील समावेश होता. आता वनडे मालिकेत विश्रांती दिलेले खेळाडू टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडीजमध्ये पोहोचले आहेत. इतर खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली असली तरी, कर्णधार रोहित शर्मा व यष्टीरक्षक रिषभ पंत हे सराव सत्रात सहभागी झाले नाही.
टी२० मालिकेत समाविष्ट असलेले जवळपास सर्व खेळाडू त्रिनीदाद येथे हजर झाले आहेत. हार्दिक पंड्या याने संघाच्या सराव सत्रात सहभाग नोंदवला. त्याच्यासोबत अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने देखील थोडेफार हात मोकळे केले. दिनेश कार्तिक, कुलदीप यादव व रविचंद्रन अश्विन हे देखील संघात सामील झाले आहेत. या सर्वांनी हलका सराव केला असला तरी, रोहित शर्मा व रिषभ पंत यांनी आराम करण्यास प्राधान्य दिले. संघाचा नियमित उपकर्णधार केएल राहुल कोविडमधून बरा होत असल्याने पहिले तीन सामने खेळणार नाही. तो अखेरच्या दोन सामन्यांसाठी थेट अमेरिकेत दाखल होईल. पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचे दोन सामने फ्लोरिडा येथे खेळवले जातील.
टी२० मालिकेला २९ जुलै रोजी सुरुवात होऊन अखेरचा सामना ७ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० सीरीजही नाही खेळणार केएल राहुल? रोहितसोबत ‘हे’ फलंदाज करतील ओपनिंग
फक्त क्षेत्ररक्षणासाठी मिळाला होता ‘मॅन ऑफ द मॅच’, सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले नाव
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला