अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (१२ मार्च) ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवपर होणार असून सर्व सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होईल. या मालिकेदरम्यान भारताचा उपकर्णधार रोहित शर्माला खास विक्रम करण्याची संधी आहे.
या मालिकेदरम्यान रोहितने जर २६ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रकारात ९ हजार धावांचा टप्पा पार करेल. तसेच ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट प्रकारात हा टप्पा पार करणारा तो दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरेल, तर जगातील नववा क्रिकेटपटू ठरेल.
ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावा करणारा पहिला भारतीय ठरण्याचा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीने मिळवला होता. विराटने ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये २९९ सामन्यात ९५०० धावा केल्या आहेत. तसेच सध्या रोहितच्या नावावर ३४० ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात ६ शतके आणि ६३ अर्धशतकांसह ८९७४ धावा आहेत.
ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये(सर्व प्रकारच्या २० षटकांच्या सामन्यात ) सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१३७२० धावा – ख्रिस गेल (४१६ सामने)
१०६२९ धावा – किरॉन पोलार्ड (५३४ सामने)
१०४८८ धावा – शोएब मलिक (४१७ सामने)
९९२२ धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (३७० सामने)
९८२४ धावा – डेव्हिड वॉर्नर (२९८ सामने)
९७१८ धावा – ऍरॉन फिंच (३१९ सामने)
९५०० धावा – विराट कोहली (२९९ सामने)
९१११ धावा – एबी डिविलियर्स (३२५ सामने)
८९७४ धावा – रोहित शर्मा (३४० सामने)
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याची संधी
रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत आणखी एक खास विक्रम करण्याती संधी आहे. त्याने जर या मालिकेत १३ षटकार किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरेल. सध्या या यादीत मार्टिन गप्टील १३९ षटकारांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर रोहित १२७ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फिटनेस टेस्टमध्ये दोनदा फेल झालेल्या ‘मिस्ट्री स्पिनर’वर भडकला विराट, म्हणाला…
“तो माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस होता, मी अक्षरश: खोलीत एकटाच ढसाढसा रडलो”
सूर्यकुमार यादवला बुमराह-संजनाच्या नात्याची पूर्वकल्पना होती? ‘ते’ ट्विट करत आहे इशारा