---Advertisement---

MI vs GT: एलिमीनेटरमध्ये ‘हिटमॅन’ने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय

On: शुक्रवार, मे 30, 2025 9:16 PM
---Advertisement---

Rohit Sharma 300 Sixes In IPL History: रोहित शर्माने यंदाच्या आयपीएल हंगामातील एलिमिनेटर सामन्यात ‘तिहेरी सेंच्युरी’ मारली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. ‘हिटमॅन’ रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्धच्या एलिमिनेटर (GT vs MI Eliminator) सामन्यात 300 षटकारांचा (Sixes) टप्पा गाठला. एलिमिनेटर सामना सुरू होण्यापूर्वी रोहितने आपल्या ऐतिहासिक आयपीएल कारकिर्दीत 298 षटकार मारले होते, आता गुजरातविरुद्ध 2 षटकार मारताच तो ‘300 सिक्स क्लब’मध्ये (300 Six Club) सामील झाला आहे.

रोहित शर्माने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 300 वा षटकार राशीद खानच्या गोलंदाजीवर मारला. हा षटकार या कारणामुळेही ऐतिहासिक ठरला कारण या षटकारासह त्याने आयपीएलमध्ये 7,000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहली नंतर अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा खेळाडू आहे. (Rohit Sharma 7000 Runs)

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत, हा रेकाॅर्ड ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत 357 षटकार मारले आहेत. (Chris Gayle Sixes) त्याच्यानंतर 300 षटकारांचा आकडा गाठणारा रोहित शर्मा आता केवळ दुसरा खेळाडू बनला आहे. (Rohit Sharma 300 Sixes) सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या आणि एमएस धोनी चौथ्या स्थानावर आहे. (Most Sixes IPL)

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार

357 – ख्रिस गेल
300+ – रोहित शर्मा
291 – विराट कोहली
264 – एमएस धोनी
251 – एबी डिव्हिलियर्स

रोहित शर्माने आयपीएलच्या इतिहासात 7,000 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. एलिमिनेटर सामन्यापूर्वी त्याने 270 सामन्यांमध्ये 6,957 धावा केल्या होत्या. आता गुजरात टायटन्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात 43 धावा करताच त्याने 7,000 धावांचा टप्पा गाठला. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याच्या पुढे फक्त विराट कोहली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत आपल्या 266 सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत 8,618 धावा केल्या आहेत. (Virat Kohli Runs)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---