केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी (१ नोव्हेंबर) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० च्या विजेत्यांना सन्मानचिन्ह दिले. गतवर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे या सोहळ्याचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. त्यामुळे खेळाडूंना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले नव्हते.
क्रीडा मंत्रालयाने गतवर्षी २९ ऑगस्ट २०२० रोजी ७४ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले होते. ज्यामध्ये ५ राजीव गांधी खेलरत्न (या पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न ठेवण्यात आले आहे.) आणि २७ अर्जुन पुरस्कारांचा समावेश होता. सोमवारी (१ नोव्हेंबर) पार पडलेल्या सोहळ्यात महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, स्टार कुस्तीपटू विनेश फोगट आणि २०१६ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मरियप्पन थांगावेलू यांच्यासह इतरांना प्रतिष्ठित खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, “राष्ट्रीय खेळ पुरस्कार हा मानाचा पुरस्कार असतो. जो भरपूर मेहनत केल्यानंतर मिळत असतो. सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन आणि भविष्यातील योजनांसाठी शुभेच्छा. विजेत्यांच्या प्रवास इथेच संपणार नाही तर आणखी खूप काही मिळवायचं आहे. आपण प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणे सुरू ठेवले पाहिजे. त्यामुळे मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की, अशा ५ खेळाडूंवर मेहनत घेण्याची शप्पत घ्या, जे येणाऱ्या काळात भारतासाठी पदक मिळवून देऊ शकतात.”
या खेळाडूंना मिळाला खेलरत्न पुरस्कार
१) रोहित शर्मा (क्रिकेट)
२)मरियप्पन थंगावेलु (पॅरा एथलेटिक्स),
३)मनिका बत्रा (टेबल टेनिस),
४) विनेश फोगाट (कुस्ती),
५)रानी रामपाल (हॉकी)
या खेळाडूंना मिळाला अर्जुन पुरस्कार
१)अतानु दास (तीरंदाजी)
२)दुती चंद (ॲथलेटिक्स)
३) सात्विकसाईराज रेंकीरेड्डी (बॅडमिंटन)
४)चिराग शेट्टी (बॅडमिंटन)
५) विशेष भृगुवंशी (बास्केटबॉल)
६) मनीष कौशिक (बॉक्सिंग)
७) लवलीना बोरगोहाई (बॉक्सिंग)
८)इशांत शर्मा (क्रिकेट),
९)दीप्ति शर्मा (क्रिकेट)
१०) सावंत अजय अनंत (घोडेस्वारी)
११) संदेश झिंगन (फुटबॉल)
१२) अदिति अशोक (गोल्फ)
१३) आकाशदीप सिंग (हॉकी)
१४) दीपिका (हॉकी),
१५)दीपक (कबड्डी)
१६) काले सारिका सुधाकर (खो-खो),
१७) दत्तू बबन भोकानल (रोइंग)
१८) मनु भाकर (नेमबाजी)
१९) सौरभ चौधरी (नेमबाजी)
२९) मधुरिका पाटकर (टेबल टेनिस)
२१)दिविज शरण (टेनिस)
२२) शिवा केशवन (शीतकालीन खेळ)
२३)दिव्या काकरान (कुस्ती)
२४) राहुल अवारे (कुस्ती)
२५)सुयश नारायण जाधव (पॅरा स्विमिंग)
२६) संदीप (पॅरा ॲथलेटिक्स)
२७) मनीष नरवाल (पॅरा नेमबाजी)
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात बटलरचे खणखणीत शतक, सामन्यानंतर सांगितले आपल्या ‘विक्रमी’ खेळीमागचे रहस्य
जॉस द बॉस; श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकत ‘या’ विक्रमात बनला इंग्लंडचा नंबर १ सलामीवीर