मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल २०२२मधील ३३वा सामना पार पडला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यादरम्यान मुंबईला पहिल्याच षटकात जोरदार झटका बसला. संघाच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी तंबू गाठला. कर्णधार रोहित शर्माच्या नावावर तर नकोशा विक्रमाचीही नोंद झाली.
या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, फलंदाजीसाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला आमंत्रित केले होते. यावेळी मुंबईकडून सलामीला स्वत: कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) हे खेळाडू आले होते. या दोघांकडून संघाला खूप अपेक्षा होत्या. मात्र, दोघांनीही अपेक्षाभंग केला.
What an over that from Mukesh Choudhary.#MumbaiIndians openers dismissed for a duck.
Live – https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/qYd5rBKwQc
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
डावाचे पहिले षटक टाकण्यासाठी चेन्नईकडून मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) आला होता. मुकेशने पहिला चेंडू रोहितला टाकला. मात्र, या चेंडूवर त्याने एकही धाव घेतली नाही. पुढचा चेंडू टाकला असता रोहित मिशेल सँटनरला झेल देत शून्य धावसंख्येवर बाद झाला. या विकेटसह रोहितच्या नावावर नकोशा विक्रमाचीही नोंद झाली. आयपीएलमध्ये सर्वाधिक १४ वेळा शून्य धावेवर बाद होणारा रोहित एकमेव खेळाडू ठरला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रोहितनंतर इशान तरी संघाचा डाव सांभाळेल असे वाटत होते. मात्र, इशानही षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. विशेष म्हणजे, इशानही यावेळी शून्य धावेवर बाद झाला. या दोघांच्या रूपात मुंबईने आपले महत्त्वाचे खेळाडू पहिल्याच षटकात गमावले. त्यामुळे संघ दबावात असल्याचे दिसत आहे.
रोहितची हंगामातील कामगिरी
आयपीएल २०२२मध्ये रोहित शर्माने या सामन्यासह ७ सामने खेळलेत. यामध्ये त्याने १६.२९च्या सरासरीने फक्त ११४ धावा केल्या आहेत. रोहितसोबतच मुंबई संघानेही हंगामात खास कामगिरी केली नाहीये. मुंबईला या सामन्यापूर्वी खेळलेल्या ६ सामन्यात सपाटून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबई विजयाचं खातं खोलण्याचा प्रयत्न करेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारत- पाकिस्तानपेक्षा कमी नाही मुंबई आणि चेन्नईचा सामना’, असं का म्हणाला हरभजन सिंग?
अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग: ए अँड ए शार्क्स संघाचा दुसरा विजय