रविवार (3 फेब्रुवारी, 2019) हा दिवस भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानच्या टी20 संघासाठी निराशाजनकच ठरला आहे.
रविवारी(3 फेब्रुवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्धचा पाचवा वनडे सामना 35 धावांनी जिंकत पाच सामन्यांची वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. मात्र या सामन्यात रोहित धावा करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला होता.
यावेळी रोहित 2 धावांवरच बाद झाला. त्याचबरोबर तो चौथ्या सामन्यातही 7 धावा करूनच बाद झाला होता. या मालिकेत त्याने 11, 87, 62, 7 आणि 2 अशा धावा केल्या होत्या. यामुळे लागोपाठ 10 वन-डे मालिकेत किमान एक तरी शतक करण्याचा त्याचा विक्रम खंडीत झाला.
तर काल (3 फेब्रुवारी) पाकिस्तानचा संघही दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या टी20 सामन्यात 7 धावांनी पराभूत झाला. यामुळे पाकिस्तानचा लागोपाठ टी20 मालिका जिंकण्याचा विक्रम कालच्या 11व्या मालिकेत येऊन थांबला.
तीन सामन्यांच्या या टी20 मालिकेत पाकिस्तान 0-2 असा मागे आहे. यामुळे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिका गमावल्यावर टी20 मालिकाही गमावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–कोहली फॅन्सच टेन्शन वाढलं, रोहित विराटचा सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी सज्ज
–२०१९च्या विश्वचषकात हा खेळाडू असणार रोहित-धवनला पर्याय
–एकेकाळी यो-यो टेस्टही पास न होणारा खेळाडू झाला टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू




