भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हे भारतीय क्रिकेटमधील सध्याचे दोन सर्वोत्तम खेळाडू मानले जातात. अनेकदा या दोघांमध्ये वाद असल्याची वृत्ते येत असतात. वेळोवेळी या दोघांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. सध्या भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यादरम्यान मोहाली येथे असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दुसऱ्या दिवशी अशी एक घटना घडली, त्यामूळे या चर्चेला पूर्णविराम लागू शकतो.
काय घडले मैदानावर?
मोहाली येथे सुरू असलेला हा कसोटी सामना दिग्गज भारतीय फलंदाज विराट कोहली याच्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना आहे. हा सामना त्याच्यासाठी खास बनवण्याची संघ सहकाऱ्यांची इच्छा असेल. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरणार होता. त्यावेळी विराट सर्वप्रथम मैदानात आला. मात्र, रोहितने त्याला पुन्हा सीमारेषेच्या बाहेर येण्यास सांगितले. कारण, रोहित आणि संपूर्ण संघ त्याला शंभराव्या कसोटीत ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यास इच्छुक होता. रोहित आणि विराट यांच्यात वाद आहे असे म्हणणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ डोळ्यांमध्ये अंजन घालणारा ठरला. मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटर हँडल वरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
The '𝗥𝗼𝗵𝗶𝗿𝗮𝘁' bond is always special! 💙#OneFamily #INDvSL @ImRo45 @imVkohli https://t.co/tLhl5VvpRB
— Mumbai Indians (@mipaltan) March 5, 2022
भारतीय संघाने गाजवला दुसरा दिवस
मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने रिषभ पंत व हनुमा विहारी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. दुसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी श्रीलंकन गोलंदाजांना घाम फोडला. अश्विनने अर्धशतक ठोकले. तर, रवींद्र जडेजा याने कारकिर्दीतील सर्वोत्तम १७५ धावांची खेळी केली. भारताने ८ बाद ५७४ धावांवर आपला डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने ४ बाद १०८ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-