---Advertisement---

विराट-रोहित म्हणजे कार्यक्रम ओके! वनडेत भल्याभल्यांना फोडतात घाम; पाहा ही आकडेवारी

On: शनिवार, डिसेंबर 3, 2022 11:01 PM
Rohit & Virat asia cup
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या बांगलादेश दौऱ्याला रविवारी (4 डिसेंबर) सुरुवात होत आहे. वनडे मालिकेने या दौऱ्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारताचा पूर्ण अनुभवी संघ सहभागी झाला आहे. भारताला या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहे. भारतीय संघातील या दोन सर्वात अनुभवी खेळाडूंची वनडे क्रिकेटमधील एकत्रित आकडेवारी पाहिल्यानंतर ती बांगलादेश संघासाठी धोकादायक ठरू शकते.

रोहित व विराट यांच्याकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा असतील. त्या दोघांचीही वनडे क्रिकेटमध्ये आकडेवारी शानदार आहे. मात्र, त्याचवेळी भागीदारीत खेळत असताना ही जोडी आणखी धोकादायक ठरते. एकत्रित भागीदारीमध्ये खेळताना या दोघांनी 82 वनडे डाव खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 4914 धावा केल्या असून, या दरम्यान त्यांची सरासरी 63.81 इतकी शानदार राहिली आहे. या दिग्गज जोडगोळीने यादरम्यान तब्बल 18 शतकी भागीदारी केल्या आहेत. तर, 15 वेळा अर्धशतकी भागीदारीची वेस ओलांडली आहे.

बांगलादेश आणि भारत यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळला जाणार आहे. मालिकेतील दुसरा सामना बुधवार (7 डिसेंबर) तर तिसरा सामना शनिवारी (9 डिसेंबर0) खेळला जणार आहे. उभय संघांतील कसोटी मालिकेची सुरुवात 14 डिसेंबर रोजी होईल. पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर यादरम्यान खेळला जाईल, तर दुसरा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबरदरम्यान पार पडेल.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन.

(Rohit Sharma And Virat Kohli Partnership Stats In ODI)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड विरुद्ध शतक ठोकताच बाबर आझमने केला विक्रम, कोहली- रोहित आसपासही नाही
जमशेदपूर एफसीला विजय आवश्यक; रविवारी त्यांच्यासमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---