ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केली जाऊ शकते. भारतीय संघात अद्यापही अशा काही जागा आहेत ज्या जागांवर कोणते खेळाडू खेळणार हे निश्चित नाही. मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर नियमित खेळणाऱ्या श्रेयस अय्यर व पाचव्या क्रमांकावरील केएल राहुल हे दुखापतग्रस्त आहेत. अशावेळी संधी दिलेल्या सूर्यकुमार यादव याला आपला प्रभाव पडता आला नाही. मात्र, असे असताना देखील कर्णधार रोहित शर्माने त्याची पाठराखण केली आहे.
टी20 क्रिकेटचा जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा फलंदाज असलेला सूर्यकुमार वनडे क्रिकेटमध्ये आपल्या लौकिकाला साधीशी खेळी करू शकलेला नाही. त्याने खेळलेल्या मागील सहा वनडे सामन्यांमध्ये तो एकदाही अर्धशतक झळकावू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तर तो तीनही सामन्यात शून्यावर बाद झाला होता. यामुळे त्याच्या संघातील जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सूर्यकुमार यादव याच्याबद्दल बोलताना मुंबईतील एका कार्यक्रमात भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,
“सूर्या आपला खेळ सुधारण्यासाठी मोठी मेहनत घेत आहे. वनडे क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी तो अशा अनेक आजी-माजी खेळाडूंची संवाद साधतोय ज्यांनी मोठ्या प्रमाणावर वनडे क्रिकेट खेळले आहे. तो एक दर्जेदार फलंदाज असून त्याला आणखी वेळ देण्याची गरज आहे. त्याने आत्मविश्वास कमावल्यानंतर तो काहीही करू शकतो यावेळी आयपीएलमध्ये खराब सुरुवातीनंतर त्याने स्पर्धा गाजवली हे आपण पाहिले आहे.”
सूर्यकुमार यादव याला वनडे क्रिकेटमध्ये विश्वचषकासाठी फिनिशर म्हणून देखील आजमावले जाण्याची शक्यता आहे. सध्या त्याची संघातील जागेसाठी थेट संजू सॅमसन याच्याशी स्पर्धा आहे. मात्र, श्रेयस अय्यर व राहुल तंदुरुस्त झाल्यास या दोघांना देखील विश्वचषकाला मुकावे लागू शकते.
(Rohit Sharma Backs Suryakumar Yadav ODI Performance Ahead ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
युवा फलंदाजाचा अश्विन आणि वसीम जाफरवर प्रभाव, दिग्गजांची विश्वचषकासाठी थेट निवडकर्त्यांकडे मागणी
बोल्टचे मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन! वाचा 11 महिन्यांनंतर देशासाठी खेळताना गोलंदाजाला काय वाटते