---Advertisement---

पत्नी आणि मुलीसाठी जेव्हा रोहित बनतो ड्रायव्हर, व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच!

On: गुरूवार, जुलै 25, 2024 6:29 PM
Rohit Sharma viral video
---Advertisement---

Rohit Sharma Viral Video : एकीकडे भारतीय खेळाडू श्रीलंकेत येत्या टी20 मालिकेची तयारी करत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे भारताचा स्टार फलंदाज आणि वनडे व कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा विश्रांतीवर आहे. भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्वाखाली आयसीसी टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकले. त्यानंतर रोहित टी20 विश्वचषक ट्रॉफीसह मायदेशी परतला आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबासह सुट्टीवर गेला आहे.

टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण रोहित अजूनही वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून रोहित पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. 27 जुलैपासून श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होत आहे. 27 ते 30 जुलै दरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर 2
ऑगस्टपासून तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

तत्पूर्वी रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित मुंबई विमानतळावर दिसत असून तो स्वतः त्याची मुलगी समायरा आणि पत्नी रितिका सजदेहचा ड्रायव्हर बनला आहे. त्याचे झाले असे की, रोहित सुट्टी संपवून मुंबईला परतला आहे. यावेळी मुंबई विमानतळावर त्याची लॅम्बोर्गिनी कार त्याची वाट पाहत होती. रोहित पत्नी रितीका आणि मुलगी समायराला आपल्या आलिशान कारमध्ये बसवतो. तेवढ्यात रोहितला सर्व बाजूंनी चाहत्यांनी घेरले होते. चाहत्यांच्या गर्दीतून कसा तरी स्वतःला सावरल्यानंतर आणि काही सेल्फी काढल्यानंतर रोहित त्याच्या कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि पत्नी व मुलीसह तिथून निघून गेला.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या नव्या जर्सीतील वाढले ‘स्टार’, फोटो पाहून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान!
IPL Auction 2025; बीसीसीआय आणि आयपीएल मालकांची होणार बैठक
या 2 स्टार्सपैकी कोणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान? श्रीलंकेमालिकेपूर्वी हेड कोच गंभीरसमोर मोठे आव्हान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---