ब्रिस्टल | रविवारी (८ जुलै) इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्माने नाबाद शतक झळकावत टीम इंडियाच्या विजेतेपदाची गुढी उभारली.
आपल्या ५६ चेंडूत नाबाद १०१ धावांच्या खेळीत रोहितने ११ चौकार आणि ५ षटकार लगावले.
त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माने आपल्या टी-२० कारकिर्दित दोन हजार धावांचा टप्पा पार करण्याचा पराक्रम केला.
कालच्या सामन्यापूर्वी रोहितने ८३ टी-२० सामन्यात १९८५ धावा केल्या होत्या.
या सामन्यात रोहितने आपली वैयक्तिक १५ वी धाव घेत टी-२० कारकिर्दीत दोन हजार धावा पूर्ण केल्या.
टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा करणारा रोहित भारताकडून दुसरा तर जागतील पाचवा फलंदाज बनला आहे.
यापूर्वी कर्णधार विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावांचा टप्पा पार केला आहे. भारताकडून दोन हजार धावा करणारा विराट कोहली पहिला फलंदाज होता.
विराट कोहलीने नुकतेच इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
तर रोहित शर्माने याच मालिकेतील तिसऱ्या सामन्यात हि किमया साधली.
टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा करणारे फलंदाज-
२२७१- मार्टिन गप्टील, सामने- ७५
२१४०- ब्रेंडन मॅक्क्युलम, सामने- ७१
२१२१- शोएब मलिक, सामने- १०३
२१०२- विराट कोहली, सामने- ६२
२०८६- रोहित शर्मा, सामने- ८४
महत्त्वाच्या बातम्या-
-बापरे! सलग ६ टी२० मालिकांमध्ये टीम इंडियाला कुणी पराभूतच करु शकले नाही






