बुधवारी (31 ऑगस्ट) आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि हॉंगकॉंग संघ आमने सामने आले. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरताच त्याच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली. रोहित शर्मा आता आशिया चषकात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनला आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आता आशिया चषकात सर्वात जास्त सामने खेळणारा फलंदाज बनला आहे. पण त्याच्या या विक्रमामुळे श्रीलंकन संघाचा माजी दिग्गज माहेला जयवर्धने (Mahela Jayawardena) याला नुकसान झाले आहे. यापूर्वी जयवर्धने या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. रोहित रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानविरुद्ध खेळला आणि जयवर्धनेची बरोबरी केली. बुधवारी त्याने हॉंगकॉंगविरुद्ध मैदानात पाय ठेवला आणि दुसरीकडे जयवर्धनेच्या विक्रम मोडीत निघाला. रोहितच्या नावापुढे आता 29 आशिया चषकातील 29 सामन्यांची नोंद झाली आहे आणि जयवर्धने मात्र 28 सामन्यांवर कायम आहे.
रोहित आणि जयवर्धनेनंतर या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याचे नाव आहे. यादीत चौथ्या क्रमांकावर मुशफिकूर रहिम (Mushfiqur Rahim) आहे. शाहिद आफ्रिदीने आशिया चषकात एकूण 27 सामने खेळले आहेत, तर बांगलादेशच्या मुशफिकूर रहिमने देखील एकूण 27 सामने खेळले आहेत.
आशिया चषकात सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू –
29- रोहित शर्मा
28- माहेला जयवर्धने
27- शाहिद आफ्रिदी
27- मुशफिकूर रहिम
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जडेजा,आवेश खान, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल
हाँगकाँग: निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅककेनी (यष्टीरक्षक), जिशान अली, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022 | पाकिस्तानविरुद्धचा मॅचविनर हार्दिक संघातून बाहेर, पंत करतोय पुनरागमन
खासच! सचिन एवढ्ढाच बाप विक्रम केलाय रोहितने, टी२०त केलाय कहर कारनामा
हाँगकाँगच नाणं खणकलंय! नाणेफेक जिंकत घेतलाय गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11