टी20 विश्वचषकात भारतानं बुधवारी (12 जून) अमेरिकेविरुद्ध 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियानं सुपर 8 मधील आपलं स्थान पक्क केलं आहे. या विजयाचा फायदा कर्णधार रोहित शर्मालाही झाला. तो आता आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकणारा दुसरा कर्णधार बनला आहे. त्यानं सौरव गांगुलीला मागे टाकलं. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप 3 भारतीय कर्णधार कोण? हे सांगणार आहोत.
(3) सौरव गांगुली – 16 विजय
भारतासाठी आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं संयुक्तपणे 2002 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि 2003 एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामनाही खेळला. गांगुलीनं आयसीसी स्पर्धेतील 22 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं. यापैकी भारतीय संघानं 16 सामने जिंकलेत.
(2) रोहित शर्मा – 17 विजय
विराट कोहलीनंतर कर्णधारपदाची सूत्रं हाती घेतलेल्या रोहित शर्माचा आयसीसी स्पर्धेत विक्रम उत्कृष्ट आहे. तो एकदा ट्रॉफी जिंकण्याच्या अगदी जवळ आला होता, जेव्हा 2023 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. रोहितनं आतापर्यंत आयसीसी स्पर्धेत एकूण 20 सामन्यातं कर्णधारपद भूषवलं, ज्यापैकी टीम इंडियानं 17 सामने जिंकले.
(1) महेंद्रसिंह धोनी – 41 विजय
टी20 आणि एकदिवसीय विश्वचषक तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा महेंद्रसिंह धोनी हा आयसीसी स्पर्धेत भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीनं 2007 मध्ये कर्णधारपदाची सूत्रं हाती घेतली आणि त्यानंतर भारतीय संघाला अभूतपूर्व यश मिळवून दिलं. आपल्या कर्णधारपदाच्या दीर्घ कारकिर्दीत त्यानं आयसीसी टूर्नामेंटमधील 58 सामन्यांत भारताचं नेतृत्व केलं, ज्यापैकी भारताचा 41 सामन्यांत विजय झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
सेमी फायनलपूर्वीच भारत-ऑस्ट्रेलिया येणार आमनेसामने! कसं ते समजून घ्या
अफगाणिस्तानच्या दिग्गज खेळाडूनं ICC रँकिंगमध्ये रचला इतिहास! हार्दिक पांड्यालाही फायदा, शाकीब अल हसनचं नुकसान
नाद करा, पण विराटचा कुठं! आफ्रिदीचा विक्रम मोडला, आता नंबर धोनीचा