भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा दुबई क्रिकेट अकादमी ‘क्रिक किंगडम’चा ब्रँड एँबेसेडर बनला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. अशामध्ये ही अकादमी कोरोना व्हायरस संपल्यानंतर ऑनलाईन कोचिंग उपलब्ध करून देणार आहे.
या माध्यमातून अनेक विद्यार्थी, प्रशिक्षक, अकादमी आणि इतर संस्था देखील जोडल्या जाणार आहेत. या अकादमीमध्ये मुंबईचा गोलंदाज धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) मार्गदर्शक आहे.
रोहितने (Rohit Sharma) दिलेल्या माहितीनुसार अकादमीने सांगितले की, “क्रिक किंगडमला (Cric Kingdom) महान खेळाडू तयार करण्याऱ्या पारंपारिक पद्धतींना आधुनिक वैज्ञानिक सराव पद्धतींशी जुळवायचे आहे. ते दूरचा विचार करतात. ते प्रत्येक गोष्टीला व्यावसायिक आणि शिस्तबद्ध बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
या माध्यमातून सर्व अकादमींना व्यवस्थापनासह, मैदान किंवा नेट्स बुकिंगची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये कमीत कमी २० प्रशिक्षक उपस्थित असणार आहेत. ज्यांनी ज्यूनियर आणि ग्राऊंड लेव्हलवर खूप काम केले आहे. यामध्ये प्रदीप इंगळे, पराग मडकईकर, सुभाष रंजने आणि प्रथमेश साळुंखे यांसारखे अनुभवी प्रशिक्षक आहेत. तसेच यामध्ये ४ गट आहेत. एक म्हणजे ५ ते ८ वर्ष, ८ ते १३ वर्ष, १३ पेक्षा अधिक वयाचे तसेच क्लब आणि एलीट लेव्हलवरील क्रिकेटर्स यांच्या कोचिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
रोहितने ३२ कसोटी सामन्यात ४६.५४च्या सरासरीने २१४१ धावा केल्या आहेत. तसेच २२४ वनडेत ४७.२७च्या सरासरीने ९११५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने १०८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३२.६२ च्या सरासरीने २७७३ धावा केल्या आहेत.
वनडेत सर्वाधिक ३ वेळा द्विशतक करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-११ वर्षांतंच अख्तरची कारकिर्द संपली असती, एका भारतीयाने केलेल्या मदताने झाला महान गोलंदाज
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे ५ कर्णधार
-रोहित, रैना व धोनी; तिघांच्याही नावावर आहे आयपीएलमध्ये एक खास कारनामा