मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 184 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार ‘रोहित शर्मा’च्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर आणि फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचवेळी मेलबर्नमधील पराभवानंतर रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा आणि नकोसा रेकाॅर्ड नोंदवला गेला आहे. खरे तर यावर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला 6व्यांदा कसोटी फॉरमॅटमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
अशाप्रकारे रोहित शर्मा (Rohit Sharma) एका वर्षात सर्वाधिक कसोटी हरणारा भारतीय कर्णधार बनला आहे. यापूर्वी हा नकोसा रेकाॅर्ड ‘सचिन तेंडुलकर’च्या (Sachin Tendulkar) नावावर होता, मात्र आता रोहित शर्माने मास्टर ब्लास्टरला याबाबतीत मागे टाकले आहे.
यापूर्वी 1999-2000 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला 5 कसोटी सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी भारताला न्यूझीलंडविरूद्ध त्यांच्याच भूमीवर 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. अशाप्रकारे भारतीय संघ तब्बल 12 वर्षांनंतर आपल्याच भूमीवर कसोटी सामन्यात पराभूत झाला.
सध्याच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2 कसोटी सामने गमावले आहेत. मात्र, न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला या वर्षाच्या सुरूवातीला इंग्लंडविरूद्ध पराभव पत्करावा लागला होता.
मेलबर्न कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताचा दुसरा डाव 155 धावांवर आटोपला. अशाप्रकारे भारतीय संघाला 184 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन केले. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. तिसरा कसोटी सामना ड्राॅ राहिला. तर चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला पुन्हा पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा, विराट कोहलीच्या भविष्याबद्दल माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य! म्हणाला…
कोणाला मिळणार ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार? या 4 खेळाडूंची नावे शाॅर्टलिस्ट
IND vs AUS; “त्याने स्वत: समजून घेणे…” रिषभ पंतबद्दल काय म्हणाला भारतीय कर्णधार?