आयपीएल 2023 स्पर्धेचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगला. या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा अपयशी ठरला. त्याला केवळ एक धाव बनवण्यात यश आले. मात्र, असे असताना देखील त्याने एक विक्रम आपल्या नावे नोंद केला.
नाणेफेक गमावल्यानंतर मुंबईला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, मुंबईच्या वरच्या फळीतील तीनही फलंदाजांना अपयश आले. ईशान किशन 13 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. कॅमरून ग्रीन याला 4 चेंडूत 5 धावाच करता आल्या. मुंबईने 6 षटकात 3 विकेट्स गमावत 29 धावा केल्या होत्या. यादरम्यान रोहितने देखील 10 चेंडू खेळले. यादरम्यान त्याला एक जीवदानही मिळाले. मात्र, तो या जीवनाचा फायदा घेऊ शकला नाही व एका धावेवर तंबूत परतला.
रोहितला मोठे धावसंख्या करताना आली नसली तरी, एका धावेमुळे देखील त्याच्या नावे एक मोठा पराक्रम जमा झाला. रोहित सलामीवीर म्हणून सचिन तेंडुलकरनंतर मुंबई इंडियन्ससाठी 2000 धावा करणारा केवळ दुसरा फलंदाज ठरला. सचिनने मुंबईसाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक 2227 धावा केल्या होत्या. तर, क्विंटन डी कॉकच्या नावे 1329 धावा मुंबईसाठी सलामीवीर म्हणून आहेत.
रोहितने या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताना आणखी एका विक्रमाला गवसने घातली. तो 200 टी20 सामन्यांमध्ये नेतृत्व करणारा जगातील तिसरा कर्णधार ठरला. भारताच्या एमएस धोनी याच्या नावे 307 टी20 सामन्यात नेतृत्व करण्याचा विश्वविक्रम आहे. तर, वेस्ट इंडिजचा डॅरेन सॅमी याने विविध संघाचे नेतृत्व करताना 208 सामने खेळले आहेत.
(Rohit Sharma Becomes Only Second Opener For Mumbai Indians Who Complete 2000 Runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलामीच्या सामन्यात सनरायझर्सचा सूर्यास्त! 72 धावांनी विजय मिळवत राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात
सनरायझर्सला बोल्टचा झटका! खाते न खोलू देता हैदराबादचे दोन फलंदाज तंबूत, पाहा व्हिडिओ