वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेचा दुसरा सामना सोमवारी (१ ऑगस्ट) खेळला जाईल. सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कमध्ये खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्माकडे दोन मोठे विक्रम करण्याची संधी आहे. परंतु हे दोन विक्रम करण्यासाठी जयमान वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात त्याला ५७ धावा आणि सोबतच ४ षटकार मारावे लागतील.
रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ४७३ षटकार मारत इतर सर्व भारतीयांना मागे टाकले आहे. त्याचसोबत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरा खेळाडू आहे, ज्याने सर्वाधिक षटकार मारले आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्ध सोमवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्यात जर रोहितने चार षटकार मारले, तर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला याचा फटका बसणार आहे. आफ्रिदी पाकिस्तानचा एक दिग्गज खेळाडू राहिला आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये दुसरा सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाजही आहे. त्याने एकूण ४७६ षटकार मारले आहेत. रोहितने जर चार षटकार अजून मारले, तर आफ्रिदीला तो मागे टाकेल. वेस्ट इंडीजचा दिग्गज ख्रिस गेल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ५५३ षटकार मारले आहेत.
रोहित शर्माकडे मोठा विक्रम नावावर करण्याची संधी
रोहित शर्माकडे या टी-२० सामन्यात अशी कामगिरी करण्याची संधी आहे, जी यापूर्वी एकही खेळाडू करू शकला नाही. त्याने मालिकेतील पहिल्या सामन्यात ६४ धावांची खेळी केली होती. अशात आता दुसऱ्या सामन्यात जर त्याने ५७ धावा केल्या, तर तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३५०० धावा करणारा पहिला खेळाडू ठरले.
दरम्यान, वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील ही टी-२० मालिका पाच सामन्यांची आहे आणि भारताने ०-१ अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारताने ६८ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ४४ चेंडूत ६४ धावा, तर फिनिशर दिनेश कार्तिकने अवघ्या १९ चेंडूत ४१ धावांची खेळी केली होती. आता मालिकेतील वर्चस्व भक्कम करण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वेटलिफ्टिंगनंतर आता बॉक्सिंगमध्ये भारताचं नाणं खणकणार, वाचा काय आहेत संधी
CWG 2022 | कॉमनवेल्थ गेम्समध्ये सायकलस्वारांनी सोडला ट्रॅक, पाहा भीषण अपघाताचा व्हिडिओ
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात होणार मोठे बदल! माजी दिग्गजाने सांगितली संभाव्य संघ