भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा आज (३० एप्रिल) आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहितवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबई इंडियन्स, आयसीसी यासह अनेक चाहत्यांनी देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यापैकीच काही शुभेच्छांवर आपण नजर टाकूया.
मुंबई इंडियन्सने केला शुभेच्छांचा शुभारंभ
आपल्या कल्पक नेतृत्वाने मुंबईला पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहितसाठी मुंबईने अनेक ट्विट केली. एकामध्ये त्याचे एक ग्राफिक्स बनवलेली दिसत आहे. तर, दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्याच्या पुल फटक्यांचा व्हिडिओ दिसत आहे. याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर हँडलवरून काही चहा त्यांची ट्विट देखील रिट्विट केली आहेत.
You can try but you'll be 𝙥𝙪𝙡𝙡𝙚𝙙 towards watching this, again & again! 💙#OneFamily #MumbaiIndians #HappyBirthdayRohit #HitmanDay @ImRo45 pic.twitter.com/vwB5tpMvyC
— Mumbai Indians (@mipaltan) April 30, 2021
👊🏻🔥 Setting the stage on fire whenever and wherever he walks in – the name is Ro-HIT Sharma 😎
Happy Birthday, Captain 💙#OneFamily #MumbaiIndians #HappyBirthdayRohit #HitmanDay @ImRo45 pic.twitter.com/ALOmyZ6NnE
— Mumbai Indians (@mipaltan) April 29, 2021
आयसीसीनेही दिल्या शुभेच्छा
आयसीसीने देखील रोहितला शुभेच्छा देताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. तर, बीसीसीआयने दिलेल्या शुभेच्छांमध्ये त्याच्या वनडे द्विशतकांचा तसेच त्याच्या धावांचा व विश्वचषक विजयाचा उल्लेख केला गेला आहे. आयपीएलमधील सर्व संघांनी देखील रोहितला या विशेष दिवशी शुभेच्छा दिल्या.
Only batsman to hit 3⃣ ODI double tons 👌
Member of #TeamIndia's 2007 World T20 & 2013 ICC Champions Trophy triumphs 🏆
1⃣4⃣,6⃣8⃣4⃣ intl runs & going strong 💪Here's wishing @ImRo45 a very happy birthday. 🎂 👏
Sit back & enjoy HITMAN's superb knock vs Australia 🎥 👇
— BCCI (@BCCI) April 30, 2021
Could watch this all day 😍
Happy birthday to the master of the pull shot, @ImRo45 🎂 pic.twitter.com/RsihxBvnmL
— ICC (@ICC) April 30, 2021
Happy Birthday, @ImRo45. We love you in blue (you know which one). 🎂😋
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 30, 2021
रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
भारतीय संघामध्ये सलामी फलंदाजाची भूमिका पार पाडत रोहितने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने आतापर्यंत एकूण २२७ वनडे सामने खेळताना ४९ च्या सरासरीने ९२०५ धावा केल्या आहेत. यात ४३ अर्धशतक तर २९ शतकांचा समावेश आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत १११ सामने खेळले असून यात ३२.५ च्या सरासरीने २८६४ धावा ठोकल्या आहेत. यात २२ अर्धशतक आणि ४ शतकांचा समावेश आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याने आपला ठसा उमटवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘माही’चा जबरा फॅन असलेला ‘हा’ युवा धुरंधर घराच्या छतावर करतोय सराव, सीएसकेकडून खेळण्याचे आहे स्वप्न
भावा आजूबाजूला पाहायचं ना! रिषभ पंतचा ‘पॅन्टलेस अवतार’ कॅमेरात कैद, नेटकऱ्यांनी घेतली मजा