भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा दुसरा टी20 सामना गुवाहाटी येथे सुरू झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी मैदानात उतरताच भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने भारतीय क्रिकेटमधील एक मोठ्या विक्रमाला गवसणी निघाली. रोहित सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये मिळून 400 टी20 सामने खेळणारा पहिला भारतीय बनला आहे.
रोहितने आजवर आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये भारतीय संघासाठी 141 सामने खेळलेत. त्याचबरोबर तो नेतृत्व करत असलेल्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्ससाठी 191 व डेक्कन चार्जर्ससाठी 47 सामने त्याने खेळले आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो प्रतिनिधित्व करत असलेल्या मुंबईसाठी 17 सामने त्याच्या नावावर आहेत. तसेच इंडियन्स संघासाठी अधिकृत 2 आणि इंडिया एसाठी 2 सामने त्याने खेळले आहेत.
आपल्या या माईलस्टोन सामन्यात रोहितची बॅट देखील चांगली बोलली. रोहितने सलामीला येत 37 चेंडूवर 7 चौकार व एका षटकारासह 43 धावा केल्या. त्याने आतापर्यंत आपल्या टी20 कारकीर्दीत 400 सामन्यात 10587 धावा केल्या आहेत. यात 6 शतकांचा व 71 अर्धशतकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज खानची ‘फर्स्ट क्लास’ इनिंग, ब्रॅडमन यांना टाकले मागे!
पाकिस्तानच्या सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूची आईदेखील उतरली क्रिकेटच्या मैदानात; मुलीने पोस्ट करत लिहिले…