भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर फोर फेरीतील चौथा सामना मंगळवारी (12 सप्टेंबर) कोलंबोमध्ये खेळला जात आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात अवघ्या 213 धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी देखील सुरुवातीपासून भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेवर दबाव ठेवला. गोलंदाजांना भारतीय क्षेत्ररक्षकांनी देखील चांगली साथ दिली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने विरोधी संघाचा कर्णधार दसून शनाक याचा असाच एक अप्रतिम झेल टिपला.
उभय संघातील या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत मजबूत भारतीय फलंदाजीला केवळ 213 धावांपर्यंत रोखले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी 7 धावांवर श्रीलंकेचा पहिला गडी बाद केला. त्यानंतर 25 धावांवर त्यांचे तीन गडी बाद झाले होते. त्यानंतर फलंदाजांनी छोट्या छोट्या भागीदारी करत श्रीलंकेचा डाव 5 बाद 73 पर्यंत नेला. त्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार बसून शंका हा श्रीलंकेला पुढे नेत असताना 26 व्या षटकात रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला.
The Rohit-Kohli hug 🫂❤️#INDvsSLpic.twitter.com/wwNwvzTJJh
— Cricket.com (@weRcricket) September 12, 2023
त्याच्या पहिल्याच चेंडूवर शनाकाने कट मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माने उजव्या बाजूला झेपावत एक अप्रतिम झेल पूर्ण केला. त्याच्या या झेलाचे सर्वत्र कौतुक होतेय.
रोहित शर्मा यांच्यासाठी हा सामना खास ठरला. त्याने आपल्या सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करण्याची कामगिरी केली. तसेच या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये दहा हजार धावांचा टप्पा देखील पार केला. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
(Rohit Sharma Complete Stunning Catch Of Dasun Shanaka Asia Cup 2023)