जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने आहेत. उभय संघांतील या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्मिथीत आहे. भारताला विजयासाठी शेवटच्या डावात 444 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताचा दुसऱ्या डावात रोहित नेहमीप्रमामे सलामीवीला आला आणि मोठा विक्रम नावावर केला.
रोहित शर्मा नेहमीच भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून खेळत आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या रोहितने सलामीवीर म्हणून शनिवारी (10 जून) आपल्या 13000 धावा पूर्ण केल्या. भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून रोहित शर्मा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यादीत पहिला क्रमांक विरेंद्र सेहवाग, तर दुसरा क्रमांक सचिन तेंडुलकर याचा आहे. सेहवागने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक 15758 धावा केल्या आहेत, तर सचिनने 15335 धावा केल्या आहेत. यादीत चौथा आणि पाचवा क्रमांक अनुक्रमे सुनील गावसकर आणि शिखर धवन यांचा आहे.
सलामीवीराच्या रूपात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
15758 – विरेंद्र सेहवाग
15335 – सचिन तेंडुलकर
13000* – रोहित शर्मा*
12258 – सुनील गावसकर
10867 – शिखर धवन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज –
19298 – सनथ जयसूर्या
18867 – ख्रिस गेल
16950 – ग्रॅमी स्मिथ
16875 – डेविड वॉर्नर
16120 – डेसमंड हेन्स
16119 – विरेंद्र सेहवाग
15335 – सचिन तेंडुलकर
15153 – तमिम इकबाल
15110 – ऍलिल्टर कूक
14825 – मॅथ्यू हेडन
13000 – रोहित शर्मा*
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघाला शेवटच्या डावात विकेट्स न करता झटपड धावा कराव्या लागतील. कारण भारताचा विजयासाठी तब्बल 444 धावा करायच्या आहेत. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात भारतासाठी रविंद्र जडेजा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर ऑस्ट्रेलियासाठी यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स केरी याने सर्वाधिक 66* धावा केल्या आहेत. तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469, तर भारताने 296 धावा केल्या होत्या. भारतासाठी पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने केलेल्या 89 धावा निर्णायक ठरल्या. (Rohit Sharma completed 13000 international runs as an opener)
महत्वाच्या बातम्या –
कांगारूंच्या दुसऱ्या डावात स्मिथ अन् हेडवरही भारी पडला कॅरे, नाबाद राहत केली ‘ही’ खास कामगिरी
WTC FINAL : ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 270 धावांवर जाहीर, भारताला कसोटी जिंकण्यासाठी 444 धावांचे आव्हान