---Advertisement---

असा कारनामा करणारा रोहित शर्मा ठरला विराट कोहली नंतरचा केवळ दुसराच भारतीय

On: सोमवार, नोव्हेंबर 12, 2018 5:25 PM
---Advertisement---

चेन्नई। भारत विरुद्ध विंडीज संघात रविवारी (11 नोव्हेंबर) तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात  रिषभ पंत आणि शिखर धवनने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांची टी20 मालिका 3-0 ने जिंकली.

मात्र या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला फलंदाजीमध्ये चमक दाखवता आली नाही. मात्र तरीही त्याने एक खास विक्रम केला आहे.

रोहित या सामन्यात 4 धावांवर असतानाच बाद झाला. त्याला किमो पॉलने बाद केले. या चार धावाही त्याने चौकार मारुन केल्या आहेत. हा चौकार त्याचा आंतरराष्ट्रीय टी20 मधील 200 वा चौकार ठरला.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 200 चौकारांचा टप्पा पार करणारा रोहित केवळ जगातील पाचवाच फलंदाज तर दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी हा टप्पा तिलत्करने दिल्शान, मोहम्मह शेहजाद, विराट कोहली आणि मार्टीन गप्टीलने पुर्ण केला आहे.

याबरोबरच रोहितने न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमच्या 199 चौकारांच्या विक्रमालाही मागे टाकत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत गप्टीलसह चौथे स्थान मिळवले आहे.

त्याचबरोबर रोहितने भारताचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करण्याचाही पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो भारताचा 11 वा कर्णधार ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू:

223 चौकार – तिलत्करने दिल्शान

218 चौकार – मोहम्मह शेहजाद

214 चौकार – विराट कोहली

200 चौकार – मार्टीन गप्टील / रोहित शर्मा

199 चौकार – ब्रेंडन मॅक्यूलम

महत्त्वाच्या बातम्या:

रोहित शर्मा, कुलदीप यादवची टी२० क्रमवारीत मोठी झेप

रिषभ पंतने २१ व्या वर्षी केला हा मोठा कारनामा; बनला रोहित शर्मा नंतरचा दुसराच खेळाडू

एकही चेंडू न खेळता भारतीय महिलांना मिळाल्या १० धावा, काय आहे कारण?

कर्णधार रोहित शर्मानेही केला विराट कोहली प्रमाणे मोठा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment