भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका मंगळवारी (9 जानेवारी) सुरू होणार आहे. यावर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा पत्रकारांना सामोरा गेला. या पत्रकार परिषदेत त्याने दिलखुलास उत्तरे दिली. या सामन्यात रोहितसह सलामीला कोण उतरणार? या प्रश्नाची देखील उकल झाली.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळला जाईल. या सामन्यासाठी सलामीवीर म्हणून भारतीय संघासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. स्वतः कर्णधार रोहित शर्मासह केएल राहुल, मागील दोन वनडे मालिकांमध्ये मालिकावीर ठरलेला युवा शुबमन गिल तसेच बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावणारा ईशान किशन हे सर्वजण संघाचा भाग आहेत. मात्र, यातून आपल्यासह गिल याला संधी मिळणार असल्याचे स्वतः रोहितने सांगितले आहे.
गिलने वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वेविरूद्धच्या वनडे मालिकांमध्ये शानदार कामगिरी करत मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. तर, दुसरीकडे किशनने द्विशतक ठोकत या जागेवर आपला हक्क सांगितलेला. मात्र, अखेरीस संघ व्यवस्थापनाने गिलच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
यापूर्वीही संघासाठी सलामीवीराची भूमिका बजावलेल्या केएल राहुल याला मधल्या फळीत खेळवणार असल्याचे संघ व्यवस्थापनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर, शिखर धवन याचा संघातील पत्ता कट झाल्याचे दिसून येतेय.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.
(Rohit Sharma Confirms Shubman Gill Will Open Against Srilanka ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘महाराष्ट्र केसरी’ला महिंद्रा थार जीपचे बक्षीस
सूर्याने सांगितले आपल्या ‘सिक्रेट कोच’चे नाव! दिले आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे श्रेय