---Advertisement---

हिटमॅनच्या ताफ्यात ‘ड्रीम कार’! कोट्यवधींची किंमत तर, वापरणारे मोजकेच भारतीय

On: बुधवार, मार्च 2, 2022 9:34 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर आहे. विराट कोहलीने तिन्ही संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहितने त्याची जागा घेतली आहे. लवकरच तो श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पण कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण करेल. मात्र, त्याच वेळी त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक खुशखबरी दिली. रोहितने त्याची ड्रीम कार घेतल्याची माहिती समोर आली आहे. ‌‌

रोहितने घेतली नवी कार

रोहितने नुकतीच जगप्रसिद्ध लेम्बोर्गिनी कंपनीची लेम्बोर्गिनी उरुस ही कार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची किंमत भारतीय रुपयात तब्बल ३ कोटी १० लाख रुपये इतकी होते. यामध्ये स्पोर्ट लेदर इंटिरियर, २२ इंच डायमंड रिंग कट या सुविधा त्याचबरोबर रोहितने आपल्या पसंतीनुसार गाडीचा इंटिरियर बनवला आहे. ज्यामध्ये काळ्या व लाल रंगाचा अधिक वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही गाडी भारतीय संघाच्या जर्सीच्या रंगाप्रमाणे निळ्या रंगाची असेल. भारतामध्ये ह गाडी फक्त अभिनेता रणवीर सिंग, कार्तिक आर्यन व दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याकडे आहे. आता यामध्ये रोहितचा समावेश झाला. रोहित हा गाड्यांचा मोठा शौकीन आहे. त्याच्या गॅरेजमध्ये आणखी काही अप्रतिम गाड्यादेखील आहेत.

कर्णधार म्हणून सुपरहिट

टी२० विश्वचषकानंतर रोहित भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनला. तेव्हापासून भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाचा आत्तापर्यंत १२ सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे. भारतीय संघाने न्यूझीलंड, वेस्टइंडीज व श्रीलंका संघांना व्हाईटवॉश देत ही कामगिरी केली. आता रोहित कसोटी कर्णधार म्हणून श्रीलंकेविरुद्ध पदार्पण करेल. मोहाली येथे होणाऱ्या सामन्यात तो प्रथमच कसोटी संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. हा सामना माझ कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असेल.

महत्वाच्या बातम्या-

पुजारा-राहणेला जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतही मिळणार नाही स्थान? वाचा सविस्तर (mahasports.in)

महिला विश्वचषक ते आयपीएल २०२२, मार्च महिना क्रिकेटप्रेमींसाठी ठरणार आहे पर्वणी (mahasports.in)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---