---Advertisement---

गार्डनमध्ये रोहितनं केली आपल्या चिमुकलीसह मस्ती; सोबतच दिसली समायराची गोंडस मैत्रीण

On: सोमवार, जून 28, 2021 7:40 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ८ विकेट्सने पराभव झाला. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडू जवळपास ३ आठवड्यांच्या सुट्टीवर आहे. त्यानंतर भारतीय संघाचे लक्ष सध्या इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेवर असेल. या इंग्लंड विरुद्धची ही मालिका ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची निराशा आता भारतीय संघाने मागे सोडली आहे. आता भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची तयारी करायची आहे. पण त्यापूर्वी खेळाडूंना ताजेतवाने होण्यासाठी बायो बबलमधून २० दिवसांसाठी सूट देण्यात आली आहे, त्यामुळे यावेळी क्रिकेटपटू आपल्या कुटुंबियांसमवेत खूप मस्ती करताना दिसत आहेत.

शनिवारी रोहित शर्मा आपली मुलगी समयरासोबत इंग्लंडमधील एका पार्कमध्ये फिरताना दिसला . इथल्या फिरण्याचा फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजिंक्य रहाणे याची मुलगी आर्याही दिसली आहे.

रोहितने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यानी लिहिले आहे की, ‘तुम्हाला जर आनंदी रहायला शिकायचे असेल तर मुलांनी तुम्हाला त्याची आठवण करुन देऊ द्या! या मुलींसह खूप मजा आली.” त्याचे चाहते रोहितचा हा फोटो प्रचंड पसंत करत आहेत आणि शेअर करत आहेत. भारतीय वेगवान गोलंदाज खालील अहमदनेही हा फोटो पसंत केला आहे.

https://www.instagram.com/p/CQlvZbbBBk5/

रोहित यापूर्वी पत्नी रितिका सजदेह आणि समायरासमवेत लंडनच्या लॉस्ट किंगडम पार्कमध्ये पोहोचला होता. लॉस्ट किंगडम पार्क हे जगातील सर्वोत्तम डायनासोर थीम पार्क आहे. येथे सर्व प्रकारचे डायनासोर प्रत्येक वळणावर आपले स्वागत करतात.

सलामीवीर म्हणून रोहित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला. या सामन्यात त्याने पहिल्या डावात ३४ धावा आणि दुसऱ्या डावात त्याने ३० धावा केल्या. विराट कोहलीच्या नेतृत्वात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ८ विकेट्सने पराभव स्वीकार करावा लागला होता.

महत्वाच्या बातम्या

कसोटी क्रिकेटमध्ये विराट ऐवजी ‘हा’ खेळाडू आहे सरस कर्णधार, बदलू शकतो भारतीय संघाचे नशीब

ठरलं एकदाचे, टी २० विश्वचषक युएईत होणार! बीसीसीआय अध्यक्षांनी दिला दुजोरा

अर्धशतकानंतर ‘अशाप्रकारे’ मिताली राजला बाद होताना पाहून क्रिकेटप्रेमीही आश्चर्यचकित, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---