इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) महासंग्रामानंतर भारतीय संघ आणि चाहत्यांना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेध लागले आहे. यातच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय दौऱ्यावर आला असून ते पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरूण जेटली या स्टेडियमवर ९ जूनला खेळला जाणार आहे.
या मालिकेसाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर विराट कोहली (Virat Kohli), मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह या महत्वाच्या खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे. नुकतेच आयपीएल झाल्याने काही नवीन खेळाडूंना संधी दिल्या आहेत, तर हार्दिक पंड्या (Hardik Pandya), कुलदीप यादव, दिनेश कार्तिक यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
आफ्रिकेविरुद्धची ही टी२० मालिका आगामी टी२० विश्वचषकासाठी महत्वाची ठरणार आहे. यामुळे या मालिकतील काही खेळाडूंना विश्वचषकाच्या संघात सामील केले जाण्याची शक्यता आहे. २०२२चा टी२० विश्वचषक (2022 T20 World Cup) ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे, तर या दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतील काही खेळाडूंकडे रोहितचे लक्ष असणार आहे. तसेच, काही खेळाडूंच्या कामगिरीने भारताला विश्वचषकाचा टप्पा सोपा जाऊ शकतो. त्यातील तीन खेळाडू आपण पाहुया…
१. दिनेश कार्तिक
सन २०१९च्या विश्वचषकानंतर भारतीय संघात पुनरागमन करणारा कार्तिक (Dinesh Karthik) हा फलंदाजीबरोबरच यष्टीरक्षणासाठीही एक पर्याय आहे. त्याने २०२२च्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना स्फोटक फलंदाजी करत संघाला सामने जिंकून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. १६ सामन्यांत त्याने ५५च्या सरासरीने ३३० धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १८३.३३ एवढा होता. या हंगामात त्याने अनेक सामन्यात कमी चेंडूत झटपट खेळी केल्याने त्याने भारतीय संघात जागा निर्माण केली आले. जर त्याने हा फॉर्म दक्षिण आफ्रिका (INDvsSA) विरुद्ध ठेवला, तर त्याची टी२० विश्वचषकातही निवड होऊ शकते.
२. आवेश खान
वेगवान गोलंदाज आवेशला (Avesh Khan) पुन्हा एकदा भारतीय संघात सहभागी केले आहे. त्याने श्रीलंकेत झालेल्या दोन टी२० सामन्यात २ विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएल २०२२मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने १३ सामन्यात ८.७३च्या इकॉनॉमी रेटने १८ विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याला संघनिवड अधिकाऱ्यांनी अजून एक संधी दिली आहे. या संधीचे त्याने सोने केले, तर नक्कीच त्याला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळेल. त्याचबरोबर रोहितवरचा गोलंदाजांचा काही ताणही कमी होईल.
३. उमरान मलिक
आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळणाऱ्या उमरान मलिक (Umran Malik) याने ताशी १५० किमी अधिक वेगाने गोलंदाजी करत संघनिवड अधिकाऱ्यांना विचार करायला लावला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना तो भारतीय संघात पदार्पण करणार आहे. दुसराच आयपीएल हंगाम खेळणाऱ्या या २२ वर्षीय खेळाडूने १४ सामन्यात २२ विकेट्स घेतल्या आहेत. एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल यांना जलद गतीने गोलंदाजी करून हैराण करणाऱ्या उमरानने जर योग्य दिशेने त्याची गोलंदाजी कायम ठेवली, तर त्याला विश्वचषकातही संधी मिळू शकते.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वत: मलिंगाने हाती घेतलंय ‘बेबी मलिंगा’ला तयार करण्याचं शिवधनुष्य, नेट्समध्ये देतोय गोलंदाजीचे धडे
नशीब असावं तर असं! एकही आयपीएल सामना न खेळूनही ‘या’ ३ खेळाडूंनी कमावले कोट्यवधी