हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने ४३२ धावांचा डोंगर उभारत, ३५४ धावांची आघाडी घेतली होती. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु, तो शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे. ज्यामुळे त्याच्या नावावर नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
इंग्लंड संघाने या सामन्यातील पहिल्या दोन्ही दिवशी अप्रतिम फलंदाजी करत आपली पकड मजबूत केली होती. इंग्लंडने पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे भारतीय संघाचे सामन्यात पुनरागमन करणे कठीण झाले होते. दरम्यान रोहितने अर्धशतक झळकावत ५९ धावांची खेळी केली. यासह त्याने चेतेश्वर पुजारासोबत मिळून महत्वाची भागीदारी देखील केली होती.
परंतु, तो अर्धशतकाचे रुपांतर शतकात करु न शकल्याने त्याचा नको असलेल्या विक्रमाच्या यादीत समावेश झाला आहे. तो परदेशात शतक न झळकावता सर्वात जास्त डावात फलंदाजी करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्मा भारतात हिट ठरत असला, तरीदेखील परदेशात तो शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे. कसोटीत परदेशात फलंदाजी करताना ४५ उलटून गेले आहेत, तरीदेखील तो शतक झळकावू शकलेला नाही. या यादीत अर्जुन रणतुंगा आणि डॅरेन गांगासारख्या दिग्गज खेळाडूंचा देखील समावेश आहे. अर्जुन रणतुंगा यांना परदेशात ७२ उलटून गेले तरी देखील एकही शतक झळकावता आले नव्हते.
परदेशात शतक न झळकावता सर्वाधिक डावात फलंदाजी करणारे फलंदाज
७२: अर्जुन रणतुंगा
६५: डॅरेन गंगा
४८: रोशन महानमा
४५: रोहित शर्मा*
महत्त्वाच्या बातम्या –
‘प्रत्येक वेळी आक्रमकतेचे प्रदर्शन करणे गरजेचे नाही’, गावसकरांचा विराटला अप्रत्यक्ष टोला
संधी मिळत नसल्याने अश्विनने सुरू केली डाव्या हाताने फलंदाजी, ट्विटर पोस्ट करताना लिहिले…
भारताविरुद्ध ३५४ धावांची आघाडी; यापूर्वी ४ वेळा इंग्लंडने घेतलीये मोठी लीड, पाहा काय लागलेत निकाल