भारताचा सलामीवीर स्फोटक फलंदाज रोहित शर्मा जसा मैदानावर स्थिर झाल्यावर गोलंदाजांवर राज्य करतो. तसाच तो चाहत्यांच्या मनावरही राज्य करतो. हेच एका व्हिडिओतून दिसून आले आहे.
इंस्टाग्रामवर रोहितचा एक व्हिडीओ वायरल झाला आहे.
यात तो त्याच्या चाहत्यांशी बोलत आहे. त्याचा चाहता त्याला म्हणाला की त्याच्या सोशल मीडियावर तो रोहितचेच फोटो डीपी म्हणून ठेवतो तसेच त्याने रोहितला एकदा त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून संदेश पाठवला होता.
विशेष म्हणजे या चाहत्याला रोहितकडून ‘हाय’ असा संदेशही आला होता. त्याबद्दल या चाहत्याने रोहितला सांगितले की “मला माहित नाही की स्वतः तुझे फेसबुक अकाउंट तू पाहतो की नाही. अर्थात तुझे सोशल मीडिया सांभाळणाऱ्या व्यक्ती असेल. पण जेव्हा तुझ्याकडून मला संदेश आला तेव्हा खुप आनंद झाला होता.”
यावर रोहित त्याला म्हणाला की, ” मी केला होता तो संदेश. मला वेळ मिळाला की मी करतो संदेश चाहत्यांना.” या चाहत्याने रोहितला तो व्हिडीओ काढत असल्याचेही सांगितले, त्यावर रोहितने हसून काढ व्हिडीओ असेही सांगितले.
https://www.instagram.com/p/BgI3pa1HIOI/?taken-by=maha_sports
या व्हिडीओमुळे रोहितचा एक वेगळाच पैलू लोकांसमोर आला आहे. असे अनेक खेळाडू आहेत जे चाहत्यांना भेटत नाही किंवा त्यांना आदर देताना दिसत नाहीत. पण ज्याप्रकारे रोहित त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत होता त्यावरून तरी रोहितचा चाहत्यांबद्दल असलेला आदर दिसून आला आहे.
रोहित सध्या श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफी या तिरंगी टी २० मालिकेत खेळत आहे. तसेच तो नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित भारतीय संघाची धुराही सांभाळत आहे.