सध्या भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात आहे. विश्वचषकाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना, भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याला अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. नक्की हे प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊया.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात #ArrestKohli हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. या ट्रेंडमुळे भारतीय चाहते चिंतेत पडले आहेत. हजारोंच्या संख्येने हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. मात्र, हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे विराट नव्हे तर त्याचा चाहता कारण आहे.
#ArrestKohli
All Rohit fans are shameless bcuz .why are you trending this trend huh?
It's not done by kohli himself.know you limits and fck up pic.twitter.com/tbFWoB2nYn— harshil vasava🇮🇳 (@Harshilvasava5) October 15, 2022
काय आहे प्रकरण?
https://twitter.com/its_monk45/status/1580963457742307328?t=jCIIBouJps-1UMer9U9BiQ&s=19
मंगळवारी (11 ऑक्टोबर) तमिळनाडूच्या मल्लुर येथील सिडको इंडस्ट्रियल एरियाच्या मैदानात विग्नेश आणि धर्मराज हे मित्र बसले असताना, क्रिकेटविषयी चर्चा करत होते. दोघांनी देखील मद्य प्राशन केले असल्याने, त्यांची चर्चा वादात बदलली. मुंबई इंडियन्सचा समर्थक असलेल्या विग्नेशने धर्मराज याच्यासह विराट कोहली व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची खिल्ली उडवली. त्यावेळी हा राग सहन न झाल्याने धर्मराज याने काचेची बाटली विग्नेशच्या डोक्यात मारली. त्यानंतर त्याने क्रिकेट बॅटने देखील त्याच्यावर हल्ला केला. विग्नेश मृत झाला आहे हे लक्षात आल्यानंतर धर्मराजने तेथून पळ काढला. त्यानंतर त्याला काही वेळाने जेरबंद करण्यात आले.
याच प्रकरणामुळे काही लोक विनाकारण विराटला लक्ष करत आहेत. परंतु, अनेकांनी या ट्रेंडची खिल्ली देखील उडवली आहे. अशा प्रकारचे निरर्थक ट्रेंड करू नयेत असे देखील आवाहन काहींनी केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकाचा डॉन भारतच! आतापर्यंत खेळलेल्या हंगामात विरोधी संघाना चारली धूळ, आकडेवारी पाहाच
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन हुशार आशियाई कर्णधार, ज्यांनी स्वतःच्या संघासाठी दिले अमूल्य योगदान