मंगळवारी (२० एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्स संघावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या पराभवानंतर आणखी एक मोठा धक्का बसला. या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून रोहितला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.
पण या सामन्यादरम्यान, जेव्हा मुंबई इंडियन्स संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला होता तेव्हा रोहित सुरुवातीच्या षटकानंतर मैदानाबाहेर गेला होता. त्यामुळे पोलार्डने मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की पोलार्ड ऐवजी रोहित शर्मावर दंड का आकारण्यात आला.
या कारणामुळे आकारण्यात आला होता रोहितवर दंड
रोहित शर्माला क्षेत्ररक्षणावेळी चेंडू लागल्यामुळे तो संघाबाहेर झाला होता. यामुळे दुसऱ्या डावात मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी कायरन पोलार्डने पार पाडली होती. आयपीएलच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक संघाला २० षटके पूर्ण करण्यासाठी ९० मिनिटांचा अवधी दिला जातो. परंतु, त्यापेक्षा जास्त अवधी घेतला तर षटकांची गती कमी राखण्याच्या कारणामुळे कर्णधारावर १२ लाखांचा दंड आकारण्यात येतो.
अशातच दिल्ली संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा मैदानात नसला तरी मुंबई संघाच्या अधिकृत शिटवर कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव होते. म्हणून हा दंड रोहित शर्मावर आकारण्यात आला होता.
रोहित शर्माने या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाजांवर निराशा व्यक्त केली होती. मुंबई इंडियन्स संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात करून देत ३० चेंडूत ४० धावांची खेळी केली होती. तरीदेखील २० षटकांच्या समाप्तीनंतर मुंबई इंडियन्स संघाला अवघ्या १३७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंद गगनात मावेना! महिद्रा यांच महागडं भिफ्ट शुबमन गीलच्या घरी पोहोचलं, फलंदाज खुश होऊन म्हणाला..