हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर रोहित शर्मा याने दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावून भारतीय संघाला सामन्यात परतण्याची आशा दिली आहे. मात्र, अर्धशतकवीर रोहित दुर्दैवी ठरला आणि अंपायर्स कॉलमुळे त्याला पायचीत होऊन माघारी परतावे लागले. तो बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहते खूपच चिडलेले दिसत आहेत. ते पंचांची जोरदार टीकाही करत आहेत.
पंच रिचर्ड केटलबरोने रोहितला ओली रॉबिन्सनच्या चेंडूवर पायचीतचा निर्णय दिला. लगेच रोहितने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर, तिसऱ्या पंचांनी पुन्हा त्याची विकेट पडताळल्यानंतर रॉबिन्सनचा चेंडू लेगस्टंपला किंचित स्पर्श करत असल्याचे दिसून आले आणि अंपायर्स कॉलमुळे रोहितला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. मैदानाबाहेर पडल्यानंतर रोहित खूपच रागात दिसत होता आणि चाहतेही सोशल मीडियावर असाच राग दाखवत आहेत.
TOO CLOSE, Barest of the margins and he was given out.
🏴 #ENGvIND 🇮🇳 #INDvsEND pic.twitter.com/ImPf31HErV
— Tushar (@ExclusiveTushar) August 27, 2021
बरेच चाहते असे म्हणत आहेत की 80% चेंडू स्टंपला न लागताही पंच रोहितला कसे बाद ठरवू शकतात? त्याचबरोबर रोहितला या पद्धतीने बाद केल्यानंतर अंपायर्स कॉलवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. अगदी रोहितची पत्नी रितीका सजदेहही पंतांच्या या निर्णयाने नाराज दिसली. तिने ट्विटरवर रोहितचा फोटो शेअर करत हृद्य तुटल्याचा इमोजी टाकला. यापुढे तिने ‘बाद की नाबाद?’ असा प्रश्न विचारला आहे.
💔 Out Or Not Out
📸:@ImRo45 | #RohitSharma pic.twitter.com/kEgiYFerm5
— Ritika Sajdeh Team (@ImRitika45) August 27, 2021
3rd class umpiring India ke khilaf hi deta Hai umpire call England ke nhi
— AAHIL (@AAHIL70280793) August 27, 2021
Ampire bhi paksh le rahe hain…agar 80%boll bahar hai not out hona chahiye 50-50ho tab out hona chahiye is niyam me badlav jaroori hai..
— Dhirendra Kumar Gupta (@Dhirend44796454) August 28, 2021
50% wicket hit kara to umpaer call hoti h rolls ka mana to Or rohit us hisab say not out match repre ko kuch karna chaya
— Rajveer basediya (@Rajveerbasediy3) August 28, 2021
Umpires Call?? worst DRS#RohitSharma pic.twitter.com/VMnLKMhE78
— Citizen ki baat (@citizenkibaat) August 27, 2021
दरम्यान तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत सामन्यात रंगत आणली आहे. रोहितने केलेले दमदार अर्धशतक, पुजाराची शतकाकडे तर कर्णधार विराट कोहलीची अर्धशतकाकडे वाटचाल हे सामन्याचे मुख्य आकर्षण ठरले. रोहितने 156 चेंडूत 59 धावा केल्या. या खेळीत त्याने एक षटकार आणि सात चौकार मारले.
खराब फॉर्मशी झगडत असलेल्या पुजाराने दमदार पुनरागमन करत सर्वांना सुखद धक्का दिला. पुजाराने 180 चेंडूत नाबाद 91 धावा केल्या. पुजाराने आपल्या खेळीत 15 चौकार खेचले. विराट कोहलीनेही शानदार फलंदाजी करत 94 चेंडूत 45 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार लगावले. अजून भारतीय संघ इंग्लंडपेक्षा 139 धावांनी पिछाडीवर आहे. भारतीय संघाच्या तिसऱ्या दिवसाखेर 2 बाद 215 धावा झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: दमदार अर्धशतकानंतर रोहित दुर्दैवीपणे बाद, रिव्ह्यू घेऊनही झाला नाही उपयोग
‘ईसीबीला हटवा, कसोटी क्रिकेट वाचवा’; हेडिंग्ले स्टेडियमवर मोठ्या बॅनरसह आकाशात उडताना दिसले विमान
रोहितच्या विकेटनंतर विराटऐवजी फलंदाजीला आला ‘तो’, पाहून पुजाराही बुचकळ्यात; व्हिडिओ व्हायरल