---Advertisement---

रोहित की विराट? कोणी गाजवलंय मँचेस्टरचं मैदान, एका क्लिकवर घ्या जाणून

On: रविवार, जुलै 17, 2022 12:17 PM
Rohit Sharma Virat Kohli
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना आज मँचेस्टरमध्ये होणार आहे. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माकडून आपल्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. दुसऱ्या वनडेत २४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या १४६ धावांवर गारद झाला. इंग्लंड विरुद्ध आज अखेरचा वनडे सामना होणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाविषयी बोलायचे झाले तर रोहित शर्मा व्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाज वनडेमध्ये शतक झळकावू शकलेला नाही. त्याने ३ सामन्यात ५३ च्या सरासरीने १५९ धावा केल्या आहेत. १४० धावांची सर्वोत्तम खेळी. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतकही झळकावले होते.

माजी कर्णधार विराट कोहलीही येथे ३ सामन्यात दिसला आहे आणि त्याने २ अर्धशतकांच्या मदतीने १५० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५० आहे आणि त्याने ७७ धावांची सर्वोत्तम खेळी खेळली आहे. मैदानावर भारतीय धावा करण्याच्या बाबतीत रोहित आणि कोहली नंबर-१ आणि नंबर-२ वर आहेत.

अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यात दोघांना नंबर-१ बनण्यासाठी चांगली कामगिरी करायची आहे. सध्याच्या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर कोहली आतापर्यंत फक्त एका सामन्यात दिसला आहे आणि त्याने १६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रोहितने २ सामन्यात सर्वाधिक ७६ धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात तो ७६ धावांवर नाबाद राहिला होता.

सध्याच्या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ८ विकेट घेतल्या आहेत. त्याने पहिल्या सामन्यात ६ विकेट्स घेत संघाला १० विकेट्सने मोठा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या ३ सामन्यात त्याला फक्त ३ विकेट घेता आल्या आहेत. ९ धावांत २ बळी हा सर्वोत्तम आहे.

दरम्यान, मोहम्मद शमीने येथे केवळ एक वनडे खेळला असून त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा एकदा अप्रतिम दाखवायचे आहे. याशिवाय लेगस्पिनर युजवेंद्र चहलने ३ सामन्यात ३ तर हार्दिक पांड्याने ३ सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

कसोटी प्रेमींसाठी खुशखबर!, भारत ऑस्ट्रेलिया संघातील सामन्यांमध्ये वाढ, असे असेल वेळापत्रक

विराटपेक्षा कमी वयाच्या बांगलादेशी कर्णधाराची T20I मधून निवृत्ती, निर्णयाने सर्वजण हैराण

बांग्लादेशने वेस्ट इंडिजला दिलाय क्लीन स्विप, ‘या’ खेळाडूने वेधले जगाचे लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---