आशिया चषक 2022 मध्ये भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजयाने केली.कट्टर प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केल्यानंतर, भारतीय संघाचा पुढील सामना बुधवारी (31 ऑगस्ट) हाँगकाँगशी होणार आहे. हा सामना जिंकून भारत सुपर फोरमध्ये आपले स्थान निश्चित करेल. भारतीय संघ हाँगकाँगविरुद्ध विजय नोंदवताच कर्णधार रोहित शर्मा हा माजी कर्णधार विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढेल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत 36 टी20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताला फक्त 6 वेळा पराभव पत्करावा लागला आहे. तर 30 वेळा भारताने विजय मिळवला. दुसरीकडे विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, कोहलीने कर्णधार म्हणून भारतासाठी 50 पैकी 30 सामने जिंकले होते. जर रोहितचा संघ हॉंगकॉंगविरूद्ध विजयाची नोंद करण्यात यशस्वी झाला तर, रोहित आंतरराष्ट्रीय टी200मध्ये भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल. कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक टी20 सामने जिंकण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. या माजी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारताने 72 पैकी 41 सामने जिंकले आहेत.
स्पर्धेतील पहिल्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, दुबई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय सर्वच गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार तर हार्दिक पंड्याने तीन बळी घेत पाकिस्तानला डोके वर काढू दिले नाही. गोलंदाजांच्या या उत्कृष्ट कामगिरीमूळे पाकिस्तानचा डाव 147 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात ही खराब झाली. राहुल शून्यावर माघारी परतला. तर, जम बसल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव माघारी परतले. मात्र, अष्टपैलू हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांनी फलंदाजी आपले मोलाचे योगदान देत भारताचा विजय साकारला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लॅक हॉक्स संघाला विजेतेपद
Asia Cup 2022: केएल राहुलसाठी शेवटची संधी? टीम इंंडियाचे समीकरण बिघडतयं
सेहवागने काढला बाप, अख्तरला चढला संताप! म्हणाला, ‘असं बोलला असता तर…’






