आजपासून भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघात तिरंगी टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला खास विक्रम करण्याची संधी आहे.
रोहितला ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी फक्त १४३ धावांची आवश्यकता आहे. जर त्याने या मालिकेत १४३ धावा केल्या तर तर तो ७ हजार धावा पूर्ण करणारा जगातील एकूण दहावा तर तिसराच भारतीय खेळाडू ठरणार आहे.
याआधी भारताकडून विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
रोहितने आत्तापर्यंत ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये २६५ सामन्यात ४ शतकांसह ३२.३४ च्या सरासरीने ६८५७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४७ अर्धशतकांचाही समावेश आहे. तसेच रोहित ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सध्या दहाव्या क्रमांकावर आहे.
ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल ११०६८ धावांसह अव्वल क्रमांकावर असून न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम दुसऱ्या स्थानी आहे.
ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
ख्रिस गेल- ११०६८ धावा
ब्रेंडन मॅक्युलम- ८८४८ धावा
किरॉन पोलार्ड- ७९३२ धावा
डेव्हिड वॉर्नर- ७६६८ धावा
शोएब मलिक- ७५७५ धावा
ड्वेन स्मिथ- ७४७६ धावा
ब्रॅड हॉज- ७४०६ धावा
सुरेश रैना-७२७५ धावा
विराट कोहली- ७०९५ धावा
रोहित शर्मा- ६८५७ धावा