भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारी (११ फेब्रुवारी) खेळला गेला. शेवटच्या सामन्यात भारताने ९६ धावांनी मोठा विजय मिळवला आणि वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप (३-०) दिला. नियमित एकदिवसीय कर्णधाराच्या रूपातील रोहित शर्मा (rohit sharma) याची ही पहिलीच मालिका होती. नियमित एकदिवसीय कर्णधारपदाची सुरुवात रोहितसाठी अतिशय खास ठरली आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या सामना संघाने ४४ धावांनी जिंकला आणि त्यानंतर शुक्रवारी खेळला गेलेला तिसरा सामना ९६ धावांनी जिंकला. वेस्ट इंडीजला मालिकेतील एकही सामना जिंकता आला नाही. ही पहिली वेळ आहे, जेव्हा भारताने वेस्ट इंडीजला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केले आहे. रोहितच्या नेतृत्वात संघ ही कामगिरी करू शकला.
रोहितच्या नेतृत्वात भारताने यापूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध मालिका खेळली आहे. २०१८ मध्ये रोहित शर्माला वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी२० मालिकेत संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती आणि भारताने त्यावेळीही वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप (३-०) दिला होता. एकंदरित पाहता भारताने रोहितच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजला टी२० आणि एकदिवसीय या दोन्ही प्रकारच्या मालिकांमध्ये क्लीन स्वीप दिला आहे. रोहित शर्माव्यतिरिक्त वेस्ट इंडीजविरुद्ध ही कामगिरी इंग्लंडचा ओएन मॉर्गन (Eoin Morgan) करू शकला आहे.
दरम्यान, रोहित शर्माने मागच्या वर्षी टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे नेतृत्वा स्वीकारले होते. विराट कोहलीने ही जबाबदारी सोडल्यानंतर रोहितवर ही जबाबदारी आली होती. त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने विराटकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्व काढून घेतले आणि ही जबाबदारी देखील रोहितकडेच आली. नियमित कर्णधार बनल्यापासून रोहितने ज्या मालिका खेळल्या, त्यापैकी एकामध्येही पराभव पत्करला नाही. या सहापैकी सहा मालिका भारतीय संघाने जिंकल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
Video | वनडे मालिकेचा चषक उंचावताना कर्णधार रोहितने केलेली कृती पाहून करोडो क्रिकेटप्रेमी भारावले
मालिकावीर प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! बुमराह-जहीर खानसारख्या मोठ्या दिग्गजांना टाकले मागे
कायरन पोलार्ड हरवला! ब्रावोने केले शोधून देण्याचे आवाहन