2024च्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं चमकदार कामगिरी केली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतानं टी20 विश्वचषक जिंकला. तब्बल 13 वर्षांनी भारतानं आयसीसी ट्राॅफीवर नाव कोरलं. त्यानंतर भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तत्पूर्वी कर्णधार रोहित शर्मानं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीबद्दल मोठा खुलासा केला आहे.
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज आहे. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “मला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यासारखं वाटत नाही, तर विश्रांती घेतल्यासारखं वाटत आहे.” रोहित शर्मानं (Rohit Sharma) भारताला त्याच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकून दिला.
A cheeky response by Captain Rohit Sharma about his T20I retirement. 🤝 pic.twitter.com/EMEuprQkLn
— Johns. (@CricCrazyJohns) August 1, 2024
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. शुक्रवार (2 ऑगस्ट) रोजी दोन्ही संघ पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी आमने-सामने असणार आहेत. कोलंबो मैदानावर हा सामना रंगणार आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 2007 साली इंग्लडविरुद्ध पदार्पण केलं होतं. त्यानं 159 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 140.89च्या स्ट्राईक रेटनं 4,231 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 32.05 आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 121 आहे. त्याच्या नावावर 32 अर्घशतक आणि 5 शतक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एकच चर्चा- ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या स्वप्निलने कोणती अंगठी घातली होती हातात?
मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेचं जगभर काैतुक, पंतप्रधान मोदींची कांस्य पदक विजेत्यासाठी खास पोस्ट
मराठी पाऊल पडते पुढे; कोल्हापुरच्या पठ्ठ्याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गरुड झेप, कांस्य पदकावर कोरलं नाव