रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल धरमशाला कसोटीच्या पहिल्या डावात सलामीला आले. त्याआधी इंग्लंड संघ प्रथम फलंदाजी करताना 218 धावांवर गुंडाळला गेला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा पाचवा कसोटी सामना असून गुरुवारी (7 मार्च) याची सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्मा याने मारलेल्या एका षटकाराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
धरमशाला कसोटीची नाणेफेक पाहुण्या इंग्लंड संघाने जिंकली आणि भारतीय संघाला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 218 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात भारताच्या पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांच्यात 104 धावांची भागीदारी पार पडली. भारतीय संघ फलंदाजीला आल्यानंतर अवघ्या चौथ्याच षटकात रोहितने आक्रमक शॉट मारला.
Mark Wood says “Hi” with 151.2 kmph and Rohit replied “Good Bye” with a pull shot for a six. 👌🫡pic.twitter.com/zITxigP7vh
— Johns. (@CricCrazyJohns) March 7, 2024
वूडच्या षटकात मार्क वूड गोलंदाजी करत होता. षटकातील चौथा चेंडू मार्क वूडने 151.2 किमी प्रति तासाच्या गतीने टाकला होता. पण भारतीय कर्णधाराने अगदी सहज पद्धतीने मारला. रोहितने मारलेला हा पूल शॉट थेड सीमारेषेपार गेला. भारतीय संघाच्या डावातील हा पहिला षटकार होता. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. (Rohit Sharma hit Mark Wood for a six off a 151 kmph ball)
धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । पहिल्या डावात कुलदीपच भारताच सर्वोत्तम गोलंदाज, मैदानाबाहेर जाताना अश्विनने जिंकलं मन
वडिलांनी आत्महत्या केली, आईला कॅन्सर झाला; ‘बेझबॉल’चा पोस्टर बॉय बेअरस्टोचा 100 कसोटीपर्यंतचा प्रवास