आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (10 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना सुरू झाला. कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित करण्यात आले. भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी शानदार शतकी सुरुवात दिली. रोहितने यादरम्यान आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने पाकिस्तान विरुद्धचा आपला शानदार रेकॉर्ड कायम ठेवला.
सुपर 4 फेरीच्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारतासाठी रोहित शर्मा व शुबमन गिल फलंदाजीला उतरले. दोघांनी पहिल्या षटकापासूनच पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. सुरुवातीला सावध पवित्रा घेतलेल्या रोहितने संधी मिळताच शादाब खानवर विशेष हल्ला चढवताना तीन षटकार खेचले. त्याने केवळ 42 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या वनडे कारकीर्दीतील हे पन्नासावे अर्धशतक ठरले.
रोहितसाठी आशिया चषकातील हे तब्बल अकरावे अर्धशतक आहे. तर पाकिस्तानविरुद्धचे आशिया चषकातील हे सहावे अर्धशतक ठरले. रोहितने इतर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पाच तर एकट्या पाकिस्तानविरुद्ध ही सहा अर्धशतके केली आहेत.
या सामन्यात भारतीय संघासाठी सुरुवात चांगली झाली रोहित व गिल यांनी अवघ्या 13.2 षटकात भारताला 100 धावा दिल्या. दोघांनी 121 धावांची सलामी दिल्यानंतर आधी रोहित व नंतर गिल तंबूत परतला. रोहित ने 56 तर गिलने 58 धावांचे योगदान दिले. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने 24.1 षटकात 147 धावा केल्या होत्या. विराट व केएल राहुल हे मैदानावर नाबाद होते.
(Rohit Sharma hits his six Asia Cup Half Century Against Pakistan Total 11)
हेही वाचाच-
भारताविरुद्ध भिडण्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! वनडेतील बादशाहत संपुष्टात, ऑस्ट्रेलिया पुन्हा नंबर 1
IND vs PAK सामन्यापूर्वी रोहितसेनेला अख्तरची चेतावणी; व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ