---Advertisement---

बदला घेतलाच! पहिल्याच ओव्हरमध्ये हिटमॅनने शाहिनला भिरकावला, पाहा कडक सिक्स

---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (10 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना सुरू झाला. कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण देण्यात आले. भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी आक्रमक सुरुवात दिली. रोहितने पहिल्याच षटकात शाहिन आफ्रिदी याला षटकार ठोकण्याचा कारनामा करून दाखवला.

जगातील सर्व क्रिकेटप्रेमींना या सामन्याची मोठी उत्सुकता होती. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मागील सामन्यात भारतीय फलंदाजांना त्रस्त केलेल्या वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याने पहिल्या षटकातील पहिल्या पाच चेंडूवर रोहित शर्माला हात खोलू दिला नाही. मात्र, अखेरचा चेंडू रोहितच्या पायावर टाकण्याची चूक त्याला भोवली. रोहितने या चेंडूचा समाचार घेत षटकार वसूल केला. विशेष म्हणजे शाहिनच्या आतापर्यंतच्या वनडे कारकिर्दीत त्याला कोणीही पहिल्या शतकात षटकार ठोकलेला नव्हता.

रोहित पाकिस्तानविरुद्धच्या साखळी फेरीतील सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्याला आफ्रिदीनेच 11 धावांवर त्रिफळाचित केले होते. मात्र या सामन्यात रोहित ने जबरदस्त खेळ दाखवत संघाला मोठी धावसंख्या उभारण्याचा पाया रचून दिला

अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारतीय संघाने 14.1 षटकार 109 धावा बनवल्या होत्या. तर रोहित व गिल दोघेही नाबाद अर्धशतके करून मैदानावर खेळत होते.

(Rohit Sharma Hits Six In First Over Against Shaheen Afridi In Asia Cup Super 4)

हेही वाचाच-
भारताविरुद्ध भिडण्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! वनडेतील बादशाहत संपुष्टात, ऑस्ट्रेलिया पुन्हा नंबर 1
IND vs PAK सामन्यापूर्वी रोहितसेनेला अख्तरची चेतावणी; व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---